Join us

​करण जोहर व काजोलमधील ‘अबोला’ संपणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 15:53 IST

एकेकाळी काजोल आणि करण जोहर यांची मैत्री बॉलिवूडमध्ये फेमस होती. पण गतवर्षी दिवाळीत ही अनेक वर्षांची मैत्री तुटली. ही ...

एकेकाळी काजोल आणि करण जोहर यांची मैत्री बॉलिवूडमध्ये फेमस होती. पण गतवर्षी दिवाळीत ही अनेक वर्षांची मैत्री तुटली. ही मैत्रीतील ‘विलेन’ ठरला तो काजोजचा पती अजय देवगण. होय, करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजय देवगण याचा  ‘शिवाय’ हे दोन चित्रपट गतवर्षी बॉक्सआॅफिसवर एकाचवेळी धडकले. याच बॉक्सआॅफिस क्लॅशमुळे करण व काजोलमध्ये दुरावा निर्माण झाला. करणने केआरकेला ‘शिवाय’ची नकारात्मक प्रसिद्धी करण्यासाठी पैसे दिलेत, अशी बातमी त्यावेळी पसरली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर करणने आपल्या आत्मचरित्रात काही खुलासे केले होते. काजोलसोबत आता माझे कुठलेही नाते राहिलेले नाही, असे त्याने सांगून टाकले होते. आमच्यात काही मतभेद झालेत. असे काही घडले, ज्यामुळे मी खोलवर दुखावला गेलो. मी याबद्दल काहीही बोलणार नाही. कारण मला जे झाले ते सगळे चव्हाट्यावर आणायचे नाही. दोन दशकांपासून आमची घनिष्ठ मैत्री होती. पण आता आम्ही एकमेकांकडे पाहून केवळ हाय-हॅलो करतो व पुढे निघतो. खरे तर तिच्यात व माझ्यात काहीही बिनसलेले नव्हतेच. जे काही झाले ते माझ्यात व तिच्या पतीदरम्यान झाले होते. जे काही घडले, ते केवळ ती, मी व तिचा पती एवढे तिघेच जाणतो. पण मी ते सगळे मागे सोडू इच्छितो. २५ वर्षांची मैत्री विसरून ती आपल्या पतीची साथ देत असेल तर माझ्यामते, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे, असे तो म्हणाला होता.  पण कदाचित काजोल व करणची मैत्री अतूट आहे. असे नसते तर जे घडले ते घडलेच नसते. होय, करण जोहरने सोशल मीडियावर काजोलला फॉलो केले आहे. अनेकांना ही करण व काजोलच्या मैत्रीची नवी सुरुवात असल्याचे वाटतेय. काल, करणने आपल्या रूही व यश या आपल्या जुळ्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. लाखो लोकांनी या फोटोला लाईक करत त्यावर कमेंट केल्या होत्या. यात एक नाव स्पेशल होते. ते म्हणजे काजोलचे. होय, करणच्या जुळ्या मुलांचा फोटो पाहून काजोल स्वत:ला रोखू शकली नाही व तिने या फोटोला लाईक केले. मग काय, करणनेही सगळे मतभेद विसरून इन्स्टाग्रामवर काजोलला फॉलो करणे सुरु केले.