सैफ अली खान आणि त्याची एक्स वाईफ अमृता सिंह या दोघांचा एक जुना फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय. खरे तर, अलीकडे कुठल्याही फोटोवरून सोशल मीडियावर जोक्स बनायला लागतात. ताजे उदाहरण द्यायचे तर शाहरूख खानच्या ‘मैं हू ना’ या चित्रपटातील एका गाजलेल्या सीनवरून काल-परवा सोशल मीडियावर जोक्सचा पूर आला होता. आता नेटिजन्सच्या नजरेत सैफ व अमृताचा हा जुना फोटो आलायं. दोघांचा हा फोटो मीडियावर आग पसरावी तसा व्हायरल होतोय. कारण काय तर, अमृताची नथ. होय, तिची नोजरिंग. या फोटोतील अमृताची नोजरिंग सध्या विानोदाचा विषय ठरली आहे. तिच्या या नोजरिंगवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे जोक्स होत आहेत.‘अमृताची नोजरिंग या व्यक्तीच्या फ्रेंड सर्कलपेक्षाही मोठी आहे,’ असे पहिले tweet आले आणि मग एकापाठोपाठ एक अशा विनोदी tweetsचा पूर आला. हा फोटो मग विनोदाचा विषय ठरला. .अमृताही सैफची पहिली पत्नी आहे. सैफ व अमृता एकमेकांना भेटले तेव्हा सैफ उणापुरा २१ वर्षांचा होता आणि अमृता ३३ वर्षांची होती. पहिल्याच भेटीत सैफ व अमृता जणू एकमेकांचे झाले. काही दिवसांच्या डेटींगनंतर अमृता व सैफ या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांसाठी हा आश्चयार्चा धक्का होता. पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सैफ व अमृताने कुणाचीही पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. आक्टोबर १९९१ मध्ये दोघांचेही धूमधडाक्यात लग्न झाले आणि अमृता छोट्या नवाबची बेगम बनली. अर्थात १३ वर्षानंतर हे नाते तुटले. दोघांनीही घटस्फोट घेतला.
हे विनोदी tweets तुम्ही खाली वाचू शकता