Join us  

सलमानला अशा कामाची येते चीड, म्हणून आजपर्यंत स्विकारली नाही अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 9:00 PM

सिनेमात काम करण्यापूर्वी कलाकार म्हणून नाहीतर एक रसिक म्हणून विचार करतो आणि तसेच काम करण्याचा प्रयत्न करतो.

दबंग सलमान खानची प्रत्येक गोष्ट खास असते. मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते. अगदी त्याचप्रमाणे त्याच्या भूमिकेचेही खासियत असते. भाईजान म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर रसिकही जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत.  सलमानने भूमिका निवडताना काही नियम अटी शिस्तीने फॉलो केले आहेत.

सलमानने आजपर्यंत अश्लिल वाटेल असे कोणतेच सीन त्याच्या सिनेमात दिलेले नाहीत.  किसिंग सीन आणि न्यूडिटीपासून चार हात लांबच  राहणे तो पसंत करतो. असे काम न करण्यामागचे कारणही सलमानने सांगितले आहे. त्याने सांगितले की, आजही मी जेव्हा कुटुंबासोबत सिनेमा पाहतो आणि असे काही सीन आले की मला स्वतःला अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळे  सिनेमात काम करण्यापूर्वी कलाकार म्हणून नाहीतर एक रसिक म्हणून विचार करतो आणि तसेच काम करण्याचा प्रयत्न करतो. 

बॉलिवूडचा दबंग खान सलमान सध्या 'दबंग ३' चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. नुकतेच त्याचे मध्य प्रदेशमधील चित्रीकरण संपले आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली  होती.तिथल्या सेटवरील फोटोदेखील शेअर केला  होता.दबंग ३'चे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा करतो आहे.

यात पुन्हा एकदा सलमान खान व सोनाक्षी सिन्हा ही जोडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 'दबंग' फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सलमान खान