Join us  

'रोमॅंटिक सीन कट केला म्हणून मी...', नीना गुप्ताचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 2:17 PM

एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता कायम चर्चेत असते. सध्या ती ज्या प्रकारे एक से एक भुमिका करत आहे त्यावरुन तिच्या चाहत्यांची संख्याही वाढली आहे.

एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता कायम चर्चेत असते. सध्या ती ज्या प्रकारे एक से एक भुमिका करत आहे त्यावरुन तिच्या चाहत्यांची संख्याही वाढली आहे. ती तिच्या खाजगी आयुष्यातही तेवढीच बोल्ड आहे. मुलाखतींमध्ये ती बिंधास्त प्रश्नांना उत्तरं देताना दिसते. मीही डिप्रेशनमध्ये गेले आहे असे तिने नुकतेच सांगितले. मात्र त्यामागचे कारण इंटरेस्टिंग आहे.

सध्या नीना गुप्ता तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर एका वर्षातच ती डिप्रेशनमध्ये गेली होती. याचं कारण होतं जाने भी दो यारो हा चित्रपट. चित्रपटात नीना गुप्ता, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर, सतीश शाह, रवी बिस्वानी आणि सतीश कौशिक हे मुख्य भुमिकेत होते. 

का आले डिप्रेशन ?

प्रमोशन दरम्यान नीना गुप्ता यांना विचारले तुमच्या करिअर मधला सगळ्यात आठवणीतला परफॉर्मंस कोणता. यावर नीना गुप्ता म्हणाल्या, 'रवी यांच्यासोबत एक रोमॅंटिक सीन होता. मात्र हा सीन फायनल कटमधून काढण्यात आला. सिनेमा गरजेपेक्षा जास्त मोठा होत होता. अशावेळी दिग्दर्शकाने हे सीन काढणे योग्य समजले. यामुळे मी डिप्रेस झाले. कारण मुख्य भुमिका असलेला हा माझा पहिलाच चित्रपट होता. याआधी मी केवळ सहकलाकाराची भुमिका करत होते.'

नीना गुप्ता या आगामी ऊंचाई या सिनेमात दिसणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इरानी, परिणीती चोप्रा यांचीही मुख्य भुमिका आहे. सूरज बडजात्या यांनी ऊंचाई चे दिग्दर्शन केले आहे. 

टॅग्स :नीना गुप्ता