Join us  

बॉलिवूडच्या या अभिनेत्यावर का वेळ आली जिलेबी व भजी तळण्याची?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 6:47 PM

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फुकरे फेम अभिनेता पुलकित सम्राट शेवटचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात दिसला होता. नुकतंच पुलकितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुलकितने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या व्हिडिओत पुलकित भजी व जिलेबी तळताना दिसत आहे. पुलकितचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतो आहे. 

या व्हिडिओत पुलकित दोन्ही हातांनी काम करताना दिसतो आहे. वायरल झालेल्या या व्हिडिओत पुलकित सम्राट आगामी चित्रपट पागलपंतीचं चित्रीकरणाचा आहे. या व्हिडिओत अभिनेता व सहकलाकार पदार्थ बनवताना दिसत आहेत.

 

पुलकितचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

फुकरे, सनम रे व वीरे दी वेडिंग चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं कौतुकाची थाप मिळविणारा पुलकित सम्राट लवकरच अनीस बझ्मी यांच्या पागलपंती चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात पुलकितशिवाय अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रुझ व अरशद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पुलकित सम्राटने २०१२ साली बिट्टू बॉस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला फुकरे चित्रपटातून ओळख मिळाली होती. त्यानंतर फुकरे रिटर्न्स चित्रपटातही दिसला होता. पुलकितचे लग्न श्वेता रोहिरासोबत झाले होते. मात्र नंतर दोघे विभक्त झाले. 

एका मुलाखतीदरम्यान श्वेताची पुलकितसोबत भेट झाली होती. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करू लागले होते.

लग्नाच्या एक वर्षानंतर दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला. श्वेताचं म्हणणं होतं की पुलकितने आपल्या कुटुंबासाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.