अनुष्का शेट्टीसाठी का महत्त्वाचा आहे ‘भागमती’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 11:57 IST
देशभर ‘पद्मावत’ हा चित्रपट चर्चेत असताना या वीकेंडला आणखी एक असाच उत्सुकता शिगेला पोहोचवणारा चित्रपट तुमच्या-आमच्या भेटीस येणार आहे. अर्थात हिंदी नाही तर तेलगू, तामिळ आणि मल्याळ या तीन भाषेत.
अनुष्का शेट्टीसाठी का महत्त्वाचा आहे ‘भागमती’?
देशभर ‘पद्मावत’ हा चित्रपट चर्चेत असताना या वीकेंडला आणखी एक असाच उत्सुकता शिगेला पोहोचवणारा चित्रपट तुमच्या-आमच्या भेटीस येणार आहे. अर्थात हिंदी नाही तर तेलगू, तामिळ आणि मल्याळ या तीन भाषेत. आम्ही कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, एव्हाना हे तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, आम्ही बोलतोय ते अनुष्का शेट्टीच्या ‘भागमती’ या चित्रपटाबद्दल. पहिले पोस्टर आले तेव्हापासून या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. ‘बाहुली2’मध्ये अनुष्का देवसेनाच्या रूपात दिसली. आता प्रेक्षक तिला ‘भागमती’ म्हणून पाहण्यास उत्सूक आहे. ‘बाहुबली2’ खरे तर मल्टिस्टारर चित्रपट होता. पण ‘भागमती’ अनुष्काचा ‘सोलो’ चित्रपट असल्याने तो अधिक महत्त्वपूर्ण आहे. याशिवायही ‘भागमती’ अनुष्का शेट्टीसाठी अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे. अनुष्काची अलीकडची ‘फिल्मोग्राफी’ बघितली की, ते लक्षात येईल. २०१७ मध्ये अनुष्काचा ‘ओम नमो व्यंकटेशा’ हा सिनेमा आला होता. याच वर्षांत अनुष्का ‘बाहुबली2’मध्ये दिसली. यापैकी ‘बाहुबली2’ सुपरडुपर हिट ठरला. पण या चित्रपटाचे सगळे यश अभिनेता प्रभासच्या खात्यात जमा झाले. अनुष्काची झोळी त्यामानाने रिकामीचं राहिली. ‘ओम नमो व्यंकटेशा’ ही बॉक्सआॅफिसवर फार कमाई करू शकला नाही. २०१५ मध्ये अनुष्काचा ‘साईज झिरो’ हा सोलो हिट आला होता. तेव्हापासून अनुष्काला एका मोठ्या हिटची वाट पाहतेय. तीन वर्षांनंतर कदाचित ‘भागमती’मुळे अनुष्काला ती संधी मिळण्याची शक्यता आहे. एकटीच्या खांद्यावर मी चित्रपट हिट करू शकते, हे सिद्ध करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. आता अनुष्का संधीचे सोने कसे करते, ते बघूच.येत्या २६ तारखेला हा चित्रपट रिलीज होतो आहे. अर्थात तेलगू, तामिळ, मल्याळममध्ये. जी. अशोकने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘भागमती’मध्ये अनुष्का गरिबांना मदत करणाºया एका आईएएस आॅफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचदरम्यान तिच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येते. भागमती हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे.