Join us

परिणीतीला का डावलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:15 IST

 परिणीती चोप्राची पूर्वीची व्यक्तीरेखा थोडीशी बबली प्रकारची होती. बॉडी शेमर्सनी सोशल मीडियावर तिच्यावर टीका केल्यानंतर तिने वजन घटवण्याचा निर्णय ...

 परिणीती चोप्राची पूर्वीची व्यक्तीरेखा थोडीशी बबली प्रकारची होती. बॉडी शेमर्सनी सोशल मीडियावर तिच्यावर टीका केल्यानंतर तिने वजन घटवण्याचा निर्णय घेतला.तिला सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत घेण्यात येणार होते. मात्र, नंतर अनुष्काच्या जागेवर परिणीतीला घेण्याचे ठरवण्यात आले. अनुष्काप्रमाणेच परिणीतीची देखील ‘बॉडी टाईप’ स्लिम फिट असूनही अनुष्कालाच का घेण्यात आले असे एक ना अनेक प्रश्न इंडस्ट्रील पडले आहेत.सलमानने यात मध्यस्ती केली आणि अनुष्काला चित्रपटात घेतले असे बोलले जात आहे. अनुष्का चित्रपटातील स्टंट्स व्यवस्थितपणे करू शकेल आणि तिची मेहनत घेण्याची तशी तयारी आहे, असे तो म्हणाला.