बॉलिवूडमधील ‘अॅक्शन’ला का कंटाळला अजय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:03 IST
दिग्गज अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण याचा मुलगा म्हणजे अभिनेता अजय देवगण. खरे तर आपल्या करिअरमध्ये अजयने अॅक्शन, रोमॅन्टिक, कॉमिक ...
बॉलिवूडमधील ‘अॅक्शन’ला का कंटाळला अजय?
दिग्गज अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण याचा मुलगा म्हणजे अभिनेता अजय देवगण. खरे तर आपल्या करिअरमध्ये अजयने अॅक्शन, रोमॅन्टिक, कॉमिक अशा सगळ्याच भूमिका केल्यात. पण अजयला ख-या अर्थाने ओळखले जाते ते अॅक्शन हिरो म्हणूनच. पण हाच अजय आता बॉलिवूडमधील अॅक्शनपटांना उबगला आहे. होय, खुद्द अजयनेच हा खुलासा केला. मी आत्तापर्यंत खूप अॅक्शन केले आणि त्या-त्यावेळी मी ते एन्जॉयही केले. पण आता मला त्याच त्या अॅक्शनचा कंटाळा आला आहे. मी वैतागलो आहे. त्यामुळेच ‘शिवाय’मध्ये मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केलाय. ‘शिवाय’मध्ये अॅक्शनच्या बाबतीत नव-नवे प्रयोग करणे कठीण होते. पण वेगळे काही करण्याचा आनंद काही औरच असतो, असे अजय म्हणाला. आता अजयचा हा खुलासा ‘प्रमोशन फंडा’ न ठरो, म्हणजे मिळवले!!