Join us

​ मधुर भांडारकर का आहेत भन्साळी, करण जोहर, एकता कपूरवर नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 12:25 IST

मधुर भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा सिनेमा बºयाच वाद-विवादानंतर अखेर रिलीज झाला. सध्या चित्रपटगृहांत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला ...

मधुर भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा सिनेमा बºयाच वाद-विवादानंतर अखेर रिलीज झाला. सध्या चित्रपटगृहांत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.   देशात १९७५ ते १९७७ याकाळात लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालखंडातील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.  ३० टक्के सत्य आणि ७० टक्के कल्पना अशा रितीने गुंफली गेलेली ही कथा पडद्यावर आणणे मधुर भंडारकर यांच्यासाठी बरेच तापदायक ठरले. यादरम्यान त्यांना ब-याच विरोधाला तोंड द्यावे लागले. राजकीय विषय असल्याने कोर्ट-कचे-यांच्या खेपा माराव्या लागल्या. सेन्सॉर बोर्डानेही त्यांच्या चित्रपटातील अनेक सीन्सवर बेदरकारपणे कात्री चालवली. हा लढा मधुर भांडारकर एकट्याने लढले. अर्थात या लढ्यात बॉलिवूडची सोबत मिळावी, ही त्यांचीही अपेक्षा होतीच. पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत, याबद्दलची खंत त्यांनी बोलून दाखवली. कुठल्याही डायरेक्टरचा सिनेमा अडचणीत येवो, मी नेहमीच त्या डायरेक्टरच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आहे. मग तो ‘उडता पंजाब’वर सेन्सॉर बोर्डाच्या वक्रदृष्टीचा मुद्दा असो वा ‘पद्मावती’च्या सेटवरचा हल्ला किंवा ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वेळी करण जोहरवर झालेली टीका असो. पण माझा अनुभव यापेक्षा पुरता उलट होता. मी सगळ्यांना पाठींबा दिला. पण माझ्या चित्रपटाला भन्साळी, करण, एकता कपूर अशा कुणीही पाठींबा दिला नाही. याचे मला प्रचंड दु:ख आहे, असे मधुर म्हणाले.अद्याप संजय लीला भन्साळी, करण जोहर वा एकता कपूर यापैकी कुणीही मधुर यांच्या या म्हणण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण अर्थात मधुर भांडारकर यांना हा संपूर्ण घटनाक्रम एक अनुभव देऊन गेला. मधुर यांना त्यांच्या पुढच्या प्रवासात या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा करू यात.