Join us  

नुसरत फतेह अली खान यांना पाहून ढसाढसा रडले होते आनंद बक्षी, अजय देवगणने सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 4:43 PM

'कच्चे धागे' सिनेमाच्या संगीताची जबाबदारी नुसरत फतेह अली खान यांना देण्यात आली होती. त्याचवेळी आनंद बक्षी गीतकार म्हणून काम बघत होते.

अजय देवगणचा 'कच्चे धागे' सिनेमाच्या दरम्यानचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'कच्चे धागे' सिनेमाच्या संगीताची जबाबदारी नुसरत फतेह अली खान यांना देण्यात आली होती. त्याचवेळी आनंद बक्षी गीतकार म्हणून काम बघत होते. पहिल्यांदाच दोघे एकत्र काम करत होते. सिनेमात अजय देवगणसह मनिषा कोइराला आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

नुसरत फतेह अली खान या सिनेमाच्या कामासाठी मुंबईला आले. महिनाभर ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले. गंमत अशी की, नुसरत साहेबांना त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे आणि तब्येतीमुळे प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते आनंद बक्षींना भेटायला हॉटेमध्ये यावे असा निरोप पाठवला. आनंद बक्षींना वाटले की नुसरत साहेबांना इगो आहे म्हणून ते स्टुडिओमध्ये न येता मलाच तिथे बोलवत आहेत. 

मात्र आनंद बक्षींनीही परिस्थीतीची शहानिशा न करताच भेटण्यास नकार दिला आणि जवळजवळ २० ते २५ वेळा त्यांना गाणी लिहून पाठवली. जितक्या वेळा ते गाणे लिहून पाठवायचे तितक्या वेळा नुसरत साहेब ते गाणे रिजेक्ट करायेच. असे एकदा नाही तर २० ते २५ वेळा झाले. शेवटी नुसरत साहेबांनीच आनंद बक्षींना भेटायचे ठरवले. 

आनंद बक्षी पहिल्या मजल्यावर राहत होते. त्यांना नुसरत साहेबांना पहिल्या माळ्यापर्यंतही एकट्याने जाणे शक्य नव्हते. सात ते आठ लोक नुसरत साहेबांना जिन्यातून उचलून आणत असल्याचे आनंद बक्षींनी पाहिले तेव्हा मात्र त्यांचा पुर्णपणे इगो तुटला. नेमकी परिस्थीती काय होती ते समजताच आनंद बक्षींनी नुसरत साहेबांसमोर हात जोडले. मुसासारखे रडू लागले.नको तो गैरसमज मी डोक्यात ठेवल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर सगळे विसरुन आनंद बक्षी नुसरत फतेह अली खानसोबत राहून अल्बम पूर्ण केला. तोच अल्बम त्यांच्या आयुष्यातला अखेरचा अल्बम ठरला. 

टॅग्स :अजय देवगण