Join us  

करोंडोची संपत्ती असूनही अजय देवगणवर आली भाड्याने घर घेण्याची वेळ, हे आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:33 AM

सध्या अजय आपल्या कुटुंबासह जुहू येथील बंगल्यात राहत आहे.

आपलं स्वप्नातलं घर खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते. हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात. आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणही सध्या अशीच मेहनत घेत आहे. इतर कलाकारांप्रमाणे एक मोठे आलिशान आशियाना त्याला उभारायाचा आहे. विशेष म्हणजे तो शोधात असलेला बंगला हा त्याला विकत घ्यायचा नसून भाड्याने घ्यायचा आहे. 

सध्या अजय आपल्या कुटुंबासह जुहू येथील बंगल्यात राहत आहे. मात्र आता त्याला त्या बंगल्याचे इंटरिअर करायचे आहे. त्यासाठी नवीन जागेत शिप्ट व्हावे लागणार आहे. इंटिरिअरचे काम जास्त दिवस चालणार असल्यामुळे सध्या  राहत असलेला बंगला त्याला सोडावा लागणार आहे. त्यामुळे  अजय नवीन जागेच्या शोधात आहे. 

घराचे इंटिरिअर करण्यासाठी अजय आणि काजोलने चांगल्या आयडीयाही सिलेक्ट केल्या आहेत. मात्र जेव्हा अजयला त्याच्या आवडीनुसार भाड्याने नवीन बंगला मिळेल, तेव्हाच त्याच्या राहत्या घराचे इंटिरिअरचे काम सुरू होणार आहे.  गेल्या दोन वर्षापासून अजय आणि काजोल बंगल्याचा शोध घेत आहेत. मात्र अजयला पाहिजे तसा बंगला मिळत नाही. त्यामुळे इंटिअरच्या कामाला वेळ लागत आहे. सध्या राहत असलेल्या बंगला हा धर्मेंद्र यांच्या बंगल्याच्या बाजुला आहे. जुहु येथील  11 नंबरच्या रोडवर अजयचा बंगला आहे. त्यामुळे त्याच परिसरात त्याला भाड्याने बंगला घ्यायचा आहे.

1999 मध्ये अजयने काजोलसह  लग्न केले होते.  न्यासा आणि युग अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.  लवकरच अजय  'दे दे प्यार दे' या सिनेमात झळकणार आहे.   

टॅग्स :अजय देवगणकाजोल