Join us  

​कुणी रचलायं ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ फ्लॉप करण्याचा कट?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 7:21 AM

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट येत्या ११ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ...

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट येत्या ११ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्याआधी हा चित्रपट फ्लॉप करण्याचा कट रचण्यात आलाय. होय, चित्रपट रिलीज होण्याआधीच तो लीक झाल्याची खबर आहे. अक्षय व भूमीच्या हा चित्रपट लीक झाला असून आपल्याजवळ पेन ड्राईव्हमध्ये हा अख्ख्या चित्रपट असल्याचा दावा एका जिम ट्रेनरने केला आहे.चित्रपटाच्या निर्मात्यांनी याप्रकरणी क्राईम ब्रँचकडे तक्रार नोंदवल्याचे कळतेय. लोखंडवालाच्या एका जिम ट्रेनरकडे पेन ड्राईव्हमध्ये हा संपूर्ण चित्रपट असल्याचे कळल्यानंतर पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. कोरिओग्राफर व रेमो डिसूजा याने निर्मात्यांना चित्रपट लीक झाल्याची सूचना दिली होती. यानंतर निर्मात्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आता हे संपूर्ण प्रकरण आपल्या हातात घेतले असून चित्रपटाची कॉपी बाहेर येऊ नये, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अ‍ॅण्टी पायरेसी स्क्वॉडला याबाबत सतर्क करण्यात आले आहे. ALSO READ : ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’तील ‘बखेडा’ तुम्ही पाहिलातं?‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट याआधी कॉपीराईट प्रकरणामुळे वादात सापडला होता. यातील ‘हंस मत पगली प्यार हो जाएगा’ या गाणे चोरल्याचा दावा करत याप्रकरणी कॉपीराईट केस दाखल करण्यात आली आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’च्या ट्रेलरला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. अरूण भाटिया निर्मित या चित्रपटात अक्षय व भूमी मुख्य भूमिकेत आहेत. केशव आणि जया नामक व्यक्तिरेखा ते साकारताना दिसणार आहे. केशव व जया दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नसल्याच्या कारणाने जया घर सोडून निघून जाते, असे याचे कथानक आहे.