Join us

क्रिती सॅननला ‘पागल’ म्हणणारी भैरवी गोस्वामी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 14:07 IST

अभिनेत्री क्रिती सॅनन हिने अलीकडे इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला होता. काही लोकांना क्रितीचा हा डान्स व्हिडिओ मनापासून आवडला. पण काहींना तो तेवढाच खटकला.

अभिनेत्री क्रिती सॅनन हिने अलीकडे इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती ‘मुबारकां’मधील गाण्यावर डान्स करताना दिसली होती. काही लोकांना क्रितीचा हा डान्स व्हिडिओ मनापासून आवडला. पण काहींना तो तेवढाच खटकला.  होय, क्रितीचा हा व्हिडिओ खटकणाºयांमध्ये कमाल आर खान अर्थात केआरके आघाडीवर होता. ‘ही बघा, बिच्चारी क्रिती. ‘राबता’ फ्लॉप झाल्यानंतर बिचारी मेंटली डिस्टर्ब झाली आहे,’ असे tweet त्याने केले होते.क्रितीला डिवचणा-या केआरकेच्या या tweet वर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या होत्या. या कमेंट्समध्ये होस्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्ट्रेस भैरवी गोस्वामी हिचीही एक कमेंट होती.भैरवीने केआरकेच्या tweetवर दिलेली प्रतिक्रिया क्रितीला आणखीच डिवचणारी होती. ‘ही वेड्यासारखी वागतेय. ही अभिनेत्री बनलीच कशी. ना हेडलाईट आहेत, ना बंपर. कॉलेज स्टुडंट तरी हिच्यापेक्षा चांगले दिसतात,’ असे भैरवीने म्हटले.भैरवीच्या या tweet कडे क्रितीने तर दुर्लक्ष केले. पण लोकांनी मात्र भैरवीला चांगलेच आडव्या हातांनी घेतले. ‘सब तो ठीक है, लेकीन आप कौन है बहेनजी,’ इथपासून युजर्सनी सुरुवात केली.  ‘ऐ भैरवी गोस्वामी कौन है? पहिली बार इसका नाम सुना है. इसे ब्लू टिक कैसे मिल गया?’, असे एका दुस-या युजरने लिहिले. एकंदर लोकांनी भैरवीला चांगलेच ट्रोल केले.भैरवी हिने ‘हेट स्टोरी’,‘भेजा फ्राई’ व ‘माय फ्रेन्ड गणेशा2’मध्ये काम केले आहे. सहा वर्षांची असताना भैरवी भारतातून विदेशात स्थायिक झाली होती. यानंतर बºयाच वर्षांनी ती अ‍ॅक्टिंग व मॉडेलिंगसाठी भारतात परतली. भैरवीचे  प्राण्यांवर अतिशय प्रेम आहे. तिला घोडेस्वारी प्रचंड आवडते. तिच्याकडे १७ घोडे आहेत.