Join us

​ख्रिसमस सेलिब्रेशन करताना असे नाचलेत अक्षय कुमार अन् ट्विंकल खन्ना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 11:49 IST

आज देशभर ख्रिसमस उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण फेस्टिव मूडमध्ये आहे. आपले बॉलिवूड सेलिब्रिटीही यात कुठेही मागे नाहीत.

आज देशभर ख्रिसमस उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण फेस्टिव मूडमध्ये आहे. आपले बॉलिवूड सेलिब्रिटीही यात कुठेही मागे नाहीत. काही क्षणांपूर्वी सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांनी अली अब्बास जफरसोबत मिळून सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात.  यापाठोपाठ अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना या दोघांनीही असाच एक व्हिडिओ पोस्ट करत, ख्रिसमसचा आनंद सगळ्यांसोबत शेअर केला. या व्हिडिओत अक्षय व ट्विंकल दोघेही ख्रिसमस ट्रीसमोर डान्स करताना दिसताहेत. ट्विंकल व अक्षयने या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अक्षय व ट्विंकलचा शुभेच्छा देण्याचा हा अंदाज चाहत्यांना इतका भावला आहे की, आत्तापर्यंत दोनशेवर लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.  सध्या अक्षय कुमार आपल्या कुटुंबासोबत केपटाऊनमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. नव्या वर्षाचे स्वागतही तो याचठिकाणी करणार आहे. काल अक्षयने याठिकाणच्या त्याच्या नव्या मित्राचा फोटो शेअर केला होता. अक्षयचा हा मित्र दुसरा कुणी नसून एक व्हॅलेन्टिनो होता. गेल्यावर्षी अक्षयने त्याच्या या खास मित्राची ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी भेट घालून दिली होती. यावर्षीदेखील  तो आपल्या या मित्राला भेटला. साहजिकच आपल्या मित्राला पुन्हा एकदा भेटल्याचा आनंद तो चाहत्यांबरोबर श्ेअर केल्याशिवाय राहू शकला नाही. यावेळेस तर अक्षयची मुलगी नितारादेखील आपल्या त्याच्या या खास मित्रासोबत एन्जॉय करताना दिसली. तिने त्याच्यासोबत चांगलीच धमालमस्ती केली. सुट्टीनंतर अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे.ट्विंकल खन्नाची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अक्षय लीड रोलमध्ये आहे.ALSO READ : अक्षय कुमारसाठी नवे नाहीत वाद! अनेकदा फसलायं वादात!!काही दिवसांपूर्वीच अक्षयने त्याच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.   त्याचबरोबर ‘2.0’ या चित्रपटामुळेही अक्षय चर्चेत आहे.  यात तो रजनीकांतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.