Join us  

खऱ्या अर्थाने गॉडफादर ठरला करण जोहर, या स्टारकिडसना बनवले स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 1:50 PM

आलियाला करणने आपली मुलगीच मानले आहे. त्यामुळे 'स्टुंटंड आफ द इयर' सिनेमात तिला संधी मिळाली. सिद्धार्थ मल्होत्रालाही करण जोहरनेच मदत केली.

हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुलं आणि मुली आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ही परंपरा सुरु आहे. आपल्या घरात सुरु असलेला अभिनयाचा वारसा दिग्गज कलाकारांची मुलं मुली पुढे नेत असतात. सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. आणखी काही स्टारकिडस आगामी काळात रूपेरी पडद्यावर एंट्री मारण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी या यंग जनरेशनला करण जोहरनेच पुढाकार घेत आपल्या सिनेमात संधी देत ओळख मिळवून दिली.

 

बॉलीवुडमध्ये गॉडफादर अशी ओळख असलेला करण जोहर  सध्या खूप चर्चेत आहे. अनेक स्टारकिडसचे हिंदी चित्रपटसृष्टीतील भविष्य उज्ज्वल बनवणा-या करण जोहरवर सध्या संतप्त प्रतिक्रीया उमटताना पाहायला मिळते. घराणेशाहीला बढावा देणारा करण जोहरला इतरांमध्ये टॅलेंट दिसत नाही. स्टारकिडसमध्येच टॅलेंट दिसतं अशा टीका सध्या होत आहेत. 

अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात  करण जोहरने त्याच्या सिनेमात आऊटसाईडर्सना संधी न देता फेमस सेलिब्रेटींच्या मुलांना संधी दिली आहे. करण जोहरने  स्टारकिडसना संधी दिली नसती तर कदाचित त्यांनाही स्ट्रगल करावे लागले असते. यात आघाडीवर आहे आलिया भट्ट. आलियाला करणने आपली मुलगीच मानले आहे. त्यामुळे 'स्टुंटंड आफ द इयर' सिनेमात तिला संधी मिळाली. सिद्धार्थ मल्होत्रालाही करण जोहरनेच मदत केली. जान्हवी कपूरला पहिला ब्रेक दिला तो करण जोहरनेच. 'धडक' सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले.

चंकी पांडेची मुलगी  अनन्या पांडेने आपल्या करिअरची सुरूवात तिच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर 2’ च्या माध्यमातून केली होती. सैफ अली खानची लेक सारा अली खान हिच्या बॉलीवुड पदार्पणासाठी करण जोहनेच मेहनत घेतली होती. याता आता शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. त्यामुळे साराचं हिंदी चित्रपटसृष्टीतील भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटल्यास वावगं ठरु नये. 

टॅग्स :करण जोहरआलिया भट