Join us

राणा डग्गुबतीला कुठली रेस्टॉरंट्स आवडतात? जाणून घेण्यासाठी वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 19:53 IST

वेगवेगळे खाद्यपदार्थ टेस्ट करायला कुणाला आवडत नाही? अन् विषय जर दिल्लीतल्या खाद्यसंस्कृतीचा सुरू असेल तर मग काय पाहायचं कामच ...

वेगवेगळे खाद्यपदार्थ टेस्ट करायला कुणाला आवडत नाही? अन् विषय जर दिल्लीतल्या खाद्यसंस्कृतीचा सुरू असेल तर मग काय पाहायचं कामच नाही. होय की नाही? तुम्हाला ठाऊक आहे सेलिब्रिटींनाही मस्तपैकी चविष्ट खाद्यपदार्थांवर ताव मारायला प्रचंड आवडतं. तसे अनेक स्टार्स आहेत पण त्यातल्या त्यात दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबती याचे नाव समोर येते. कारण त्याने अलीकडेच त्याचे दिल्ली आणि तेथील खाद्यसंस्कृतीवरील प्रेम जाहीर केले आहे. त्याला जुन्या दिल्लीतील रेस्टॉरंट्स प्रचंड आवडतात. ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती याने मागील महिन्यात दिल्लीतील ‘कॉमिक कॉन’ याठिकाणी भेट दिली. त्याचे दिल्लीवरील प्रेम विशद करताना तो म्हणतो की, ‘भारतीय चित्रपटांचे लाँचिंग आणि प्रमोशन हे मुख्यत्वेकरून दिल्लीतच व्हायला हवे. मी कामानिमित्त नेहमीच दिल्लीत येत असतो. दरवेळी मी वेगवेगळ्या ठिकाणी उत्तम जेवण करण्याचा प्रयत्न केला. पण, जुन्या दिल्लीतील जेवण मला प्रचंड आवडलं. मला वाटतं की, अनेक चित्रपट प्रदर्शित होत राहावेत आणि त्यांचे लाँचिंग आणि प्रमोशन हे मात्र दिल्लीतच व्हावे. जेवणासाठी एवढं तरी आपण स्वार्थी नक्कीच होऊ शकतो.’‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून, दिग्दर्शक राजामौली यांनी तसे सोशल मीडियावर फोटोसह शेअर देखील केले होते. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ या चित्रपटापासून शोधत असलेल्या ‘कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा’ या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.