Join us  

 २०१६ पासून कुठे गायब आहे ‘रॉक ऑन’ स्टार प्राची देसाई? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 8:00 AM

२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई गत दोन वर्षांपासून जणू गायब आहे. साहजिकच, प्राची कुठे गायब आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे.

ठळक मुद्देप्राचीने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती.

२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई गत दोन वर्षांपासून जणू गायब आहे.  पार्ट्या आणि इव्हेंट सोडले तर प्राची बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. २०१६ मध्ये ‘रॉक ऑन 2’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर २०१७ मध्ये ती छोट्या पडद्यावर दिसली खरी. पण ती एक शॉर्ट फिल्म होती. साहजिकच, प्राची कुठे गायब आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे.

होय, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक चित्रपट देणारी ही अभिनेत्री सध्या  मल्याळम चित्रपटात बिझी आहे. ‘ममंगम’ या मल्याळम चित्रपटाचे शूटींग ती करतेय. या चित्रपटाशिवाय ‘कोशा’ या एका चित्रपटातही झळणार आहे. म्हणजे, यावर्षांत प्राचीचे दोन प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहेत. ‘कोशा’ सध्या पोस्ट प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे.

 ‘ममंगम’ हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. ‘बाहुबली’ सीरिजपेक्षाही या चित्रपटाचा बजेट मोठा आहे.   साऊथ सुपरस्टार ममुटी यात मुख्य भूमिकेत आहे.

प्राचीने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. या शोमध्ये राम कपूरने मिस्टर वालियाची भूमिका साकारली होती. शोमधील राम कपूर व प्राची यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला एक किसींग सीन प्रचंड गाजला होता. त्यानंतर ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.  

टॅग्स :प्राची देसाई