Join us  

जिंवत राहण्यासाठी दर आठ तासांनी अभिनेत्रीला करावे लागयाचे हे काम, एक वेळ तर अशी आली की,....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 6:57 PM

आजाराशी लढण्याचा निर्णय घेतला आणि योग करण्यास सुरवात केली. एकदा, प्रकृती इतकी बिघडली की, एडमिट करण्यात आले, योग्य उपचार घेतल्यानंतर मनात पक्का निर्णय केला काहीही केले तरी हार मानायची नाही आणि आजाराशी लढले,

फारच कमी लोकांना माहिती आहे की, करिअरच्या सुरुवातीच्या काळातच सुष्मिताला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. या आजारामुळेच तिची अवस्था अधिक बिकट झाली होती.  स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तिला  स्टिरॉइड्सचा आधार घ्यावा लागला होता. या आजारपणामुळे तिच्या शरिरात कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन बनणे थांबले होते.

 

आजारपणाविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या शरीराचे अवयव एक एक करून काम करणे थांबवत होते.अजिबात ताकद उरली नव्हती. खूप अशक्त झाले होते.  असं असतानाही सुष्मिताने चित्रपटसृष्टीत काम करणे सुरुच ठेवले. रुपेरी पडद्यावर झळकण्याचं जे स्वप्न असतं ते तिने मेहनतीच्या जोरावर साकार केले . इतके मोठं आजारानेग्रस्त असतानाही तिनं कधीही हार मानली नाही किंवा ती खचूनही गेली नाही. 

त्यादरम्यान माझा चेहरा निश्तेज दिसायला लागला होता आणि जिवंत राहण्यासाठी शरीरावर स्टिरॉइड्सवर अवलंबून रहावे लागले. याचा अर्थ असा की मला सतत हायड्रोकोर्टिसोन नावाचे औषध घ्यावे लागायचे ज्याला स्टिरॉइड म्हटले जाते. हे औषध जिवंत राहण्यासाठी दर 8 तासांनी घ्यावे लागायचे.

माझे केसही हळहूळ खुप गळायला लागले होते, विरळ होत चालले होते. वजनही वाढले होते. आजारपणामुळे दिवसेंदिवस अवस्था आणखीन बिकट होणार याचा अंदाजा होता. त्यामुळे आजाराशी लढण्याचा निर्णय घेतला आणि योग करण्यास सुरवात केली.

 

एकदा, प्रकृती इतकी बिघडली की, एडमिट करण्यात आले, योग्य उपचार घेतल्यानंतर मनात पक्का निर्णय केला काहीही केले तरी हार मानायची नाही आणि आजाराशी लढले, योग्य आहार घेतला, नियमितपणे योगा करत अखेर आजारपणाला कायमचे मिटवून टाकले. या आजारांमधून लढण्याची किंबहुना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाल्याचंही ती सांगते. आपल्या शरीराचा सन्मान करत असल्याचंही ती सांगते. आपण कामापेक्षा आरोग्याची काळजी घेणं आणि जगण्याचा आनंद घेण्याला प्राधान्य देत असल्याचे  सुष्मिताने म्हटले होते. 

आता  सुष्मिता सेनचे वय ४५ वर्ष आहे तिचे अद्याप लग्न झाले नाही. 2000 मध्ये तिने वयाच्या 24 व्या वर्षी मोठी मुलगी रिनीला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने तिने सा-यांनाच चकित केले. २०१० मध्ये दुसरी मुलगी अलीशा दत्तक घेतले. सिंगल मदर बनलेली सुष्मिता तिच्या मुलींच्या सांभाळकरत त्यांच्यासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसते.

टॅग्स :सुश्मिता सेन