Join us  

शाहरुख खानने प्रियंका चोप्राला पहिल्याच भेटीत विचारले होते, लग्नाबाबत हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 11:15 AM

शाहरुखने विचारलेल्या या प्रश्नावर प्रियंकाने खूपच चांगले उत्तर दिले होते.

ठळक मुद्देशाहरुखने विचारले होते की, तुला कोणासोबत लग्न करायला आवडेल... एखादा खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचे नाव उंचावले आहे की एखाद्या व्यवसायिकासोबत...

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. प्रियंका चोप्रा पती  निक जोनाससोबत अमेरिकेत असून तिथे देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून लोकांना घरीच राहाण्याविषयी सांगण्यात आले आहे. प्रियंका सध्या तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. 

प्रियंकाच्या फॅन्सना तिची आणि निकची जोडी प्रचंड आवडते. पण प्रियंका आणि निकचे लग्न होण्याआधी तिचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी प्रियंका आणि शाहरुखच्या अफेअरची तर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनी दोघांनी फरहान अख्तरच्या डॉन या चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच या चर्चांना ऊत आले होते. पण त्या दोघांनीही या चर्चांवर मौन राखणेच पसंत केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमध्ये प्रियांकाने प्रवेश करण्याआधीच तिची शाहरुख खानसोबत भेट झाली होती.

प्रियांका चोप्रा ही मिस वर्ल्ड असून मिस इंडिया स्पर्धेच्यावेळेस परीक्षकांमध्ये शाहरुख खान देखील होता. फेमिना मिस इंडिया २००० च्या शेवटच्या १० स्पर्धकांमध्ये प्रियांका चोप्राचा समावेश होता. मिस इंडियाच्या वेळी शाहरुखने परीक्षक म्हणून तिला एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न थेट तिच्या खाजगी जीवनाविषयी होता. त्याने विचारले होते की, तुला कोणासोबत लग्न करायला आवडेल... एखादा खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचे नाव उंचावले आहे की एखाद्या व्यवसायिकासोबत, जो तुला संपूर्ण जग फिरवेल, तुला दागिने, घर भेटवस्तू म्हणून देईल की माझ्यासारख्या हिंदी इंडस्ट्रीतील नायकासोबत...

प्रियांकाला विचारण्यात आलेला हा प्रश्न अतिशय कठीण होता. पण तिने क्षणाचाही विलंब न लावता सांगितले होते की, मला एखाद्या खेळाडूसोबत लग्न करायला आवडेल. भारतासाठी त्याने विजय मिळवल्यानंतर तो जेव्हा घरी परतेल, त्यावेळी मला देखील तुझ्याविषयी प्रचंड अभिमान असल्याचे मी त्याला सांगेन.

प्रियांकाने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता त्यावेळी त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मलायका अरोराने केले होते. प्रियांकाच्या या उत्तरावर सगळेच परीक्षक प्रचंड खूश झाले होते. मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतरच बॉलिवूडचे दरवाजे प्रियांकासाठी खुले झाले होते.

टॅग्स :शाहरुख खानप्रियंका चोप्रा