Join us  

या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी कंटाळला होता सचिन तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 6:30 AM

सचिन तेंडुलकर आणि एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती.

ठळक मुद्देसचिनने म्हटले होते की, माझ्याविषयी मी वाचलेली सगळ्यात विचित्र अफवा म्हणजे माझे आणि शिल्पा शिरोडकरचे अफेअर आहे. आम्ही दोघे एकमेकांना ओळखत देखील नसल्याने याचा प्रश्नच येत नाही.

शिल्पा शिरोडकरने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर होती. पण 13 वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पण गेल्या काही वर्षांत शिल्पा इतकी बदलली आहे की, तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. शिल्पाचा नुकताच म्हणजेच 20 नोव्हेंबरला वाढदिवस होता. अभिनयापेक्षा शिल्पा बोल्ड दृश्यांमुळे अधिक चर्चेत आली होती.

तुम्हाला माहीत आहे का, शिल्पा आणि सचिन तेंडुलकर यांच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. सचिन आणि शिल्पा या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही असल्याच्या बातम्यांना एकेकाळी ऊत आले होते. या सगळ्या अफवांमुळे सचिन प्रचंड चिडला होता आणि मी शिल्पाला कधीच भेटलो नाही अशी प्रतिक्रिया त्याने प्रसारमाध्यमांना दिली होती तर शिल्पाने या प्रकरणात शांत राहाणेच पसंत केले होते. 

सचिनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याच्याविषयी कोणत्या विचित्र अफवा त्याने ऐकल्या आहेत याविषयी सांगितले होते. त्याने म्हटले होते की, माझ्याविषयी मी वाचलेली सगळ्यात विचित्र अफवा म्हणजे माझे आणि शिल्पा शिरोडकरचे अफेअर आहे. आम्ही दोघे एकमेकांना ओळखत देखील नसल्याने याचा प्रश्नच येत नाही.

सचिनने ही प्रतिक्रिया दिल्यानंतर सचिन आणि शिल्पाच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. सचिनने यानंतर काहीच वर्षांत अंजलीशी तर शिल्पाने युकेतील अपरेश रंजीत या बँकरसोबत लग्न केले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरशिल्पा शिरोडकर