अनेक दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणा-या कपूर घरााण्यातील अनेक सदस्य फिल्मी दुनियेत आहेत. या घराण्यातील मुलींना चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नव्हती. पण करिना आणि करिश्मा (Kareena Kapoor and Karisma Kapoor) या दोघांनी याविरोधात जात, फिल्मी दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज त्या दोघीही बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. अर्थात यासाठी दोघींनीही संघर्ष केला.
होय, कधीकाळी याच करिश्मा व करिनाची शाळेची फी भरायलाही त्यांच्या वडिलांजवळ पैसे नव्हते. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. खुद्द करिश्मा व करिनाचे पापा रणधीर कपूर (Randhir Kapoor ) यांनी हा खुलासा केला होता. होय, एका मुलाखतीत रणधीर कपूर यावर बोलले होते. कपूर घराण्याचा वारस शिवाय एक अभिनेता असूनही करिश्मा व करिनाचा सांभाळ करणे मला कठीण जात होते, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
ते म्हणाले होते, ‘आजच्या कलाकारांसाठी पैसा कमावणे फार सोपे आहे. पण मी काम करत असताना पैसा कमावणे इतके सोपे नव्हते. माझ्याकडे माझ्या मुलींची ट्युशन फी भरायलाही पैसे नसतं. अगदी वीजेचे बिल आणि बायकोचा खर्च करण्यासाठीही माझ्याजवळ पैसे नव्हते. आज अॅक्टर्स बक्कळ पैसा कमावतात. पण आम्हाला पैसे कमावताना प्रचंड कष्ट करायला लागायचे. करिश्मा-करिनाच्या शाळेची फी, वीजेचे बिल, माझी स्कॉच, बाकीचे खर्च यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आजचे स्टार्स जाहिराती, इव्हेंट्स आणि अन्य मार्गाने कमावतात. आम्ही वर्षाला फक्त एक सिनेमा करायचो आणि काम नसेल तर आमच्याकडे घरखर्चालाही पैसे नसायचे.’