Join us  

 त्या इंटिमेट फोटोंनी नयनताराच्या आयुष्यात आले होते वादळ, क्षणात संपली होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:51 PM

नयनतारा- सिंबूच्या लीक झालेल्या इंटिमेट फोटोंनी माजवली होती खळबळ   

ठळक मुद्देनयनतारा व सिंबू यांनी अनेक सिनेमांत काम केले. रिलेशनशिपमध्ये असताना दोघेही सर्रास पार्ट्यांमध्ये, इव्हेंटमध्ये एकत्र दिसत. 

 साऊथची सुपरस्टार नयनतारा कधीकाळी अभिनेता व कोरिओग्राफर प्रभुदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती, हे तुम्हाला ठाऊक आहेच. अर्थात ही लव्हस्टोरी कधीच संपलीय. आता नयनतारा दिग्दर्शक विग्नेश सिवानच्या प्रेमात वेडी झालीय. पण हे इतकेच नाही़ प्रभुदेवाआधी एका दुस-याच अभिनेत्यावर नयनतारा भाळली होती. 

सहा-सात वर्षांपूर्वीचीच गोष्ट. नयनतारा त्यावेळी प्रभुदेवा नाही तर साऊथ अभिनेता सिलाम्बारासन उर्फ सिंबूच्या प्रेमात वेडी झाली होती. पण दोघांचे काही इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यामुळे नयनताराने सिंबूसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले होते.

तर 2014 साली नयनतारा व सिंबूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये दोघेही लिपलॉक करताना दिसले होते. हे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. विशेष म्हणजे नयनताराला त्यापेक्षाही मोठा धक्का बसला होता.नयनतारा हा धक्का पचवू शकली नाही. सिंबूला यासाठी जबाबदार ठरवून तिने त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले.

पुढे अनेक वर्षांनी सिंबू यावर बोलला होता. फोटो लीक झाल्याचे पाहून मलाही तेवढाच धक्का बसला होता. पण हे सगळे मी केले नव्हते. हे फोटो माझ्या जुन्या फोनमधून घेतले गेले होते. कदाचित तेथून ते लीक झाले असावेत, असे त्याने म्हटले होते.

नयनतारा व सिंबू यांनी अनेक सिनेमांत काम केले. रिलेशनशिपमध्ये असताना दोघेही सर्रास पार्ट्यांमध्ये, इव्हेंटमध्ये एकत्र दिसत. पण या लीक प्रकरणानंतर नयनतारा सिंबूला विसरून आयुष्यात कधीच पुढे निघून गेली. सिंबूसोबतचे नाते संपल्यानंतर ती प्रभुदेवाच्या जवळ आली. अर्थात हे नातेही फार काळ टिकले नाही. प्रभुदेवालाही तिने अचानक सोडले. सध्या नयनतारा विग्नेशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :बॉलिवूड