Join us  

किस्सा किसचा ! कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतचा आजही Kissing Scene करताना उडतो थरकाप, तो क्षण आठवताच होते अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 4:24 PM

मीकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती.

बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणाऱ्या मीका सिंहचा आज वाढदिवस. मीका सिंहला जेवढं त्याच्या गाण्यांसाठी ओळखलं जातं तेवढाच तो वादांमुळे चाहत्यांच्या लक्षात राहिलेला आहे. 2006 मध्ये त्याच्याच बर्थ डे पार्टीत राखी सांवत सहभागी झाली होती. त्यावेळी मीकाने राखीला सर्वांसमोर किस केले होते. या घटनेमुळे राखी चांगलीच भडकली होती. मीकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती.  14 वर्षांपूर्वी मीका सिंहचा हा किसचा कारनामा आजही लोक विसरलेले नाहीत. 

मुळात राखी सावंतदेखील त्या रात्री घडलेल्या कारनामा आठवताच आजही तिचा थरकाप उडतो. राखीने जबरदस्ती मिकाच्या चेह-याला केक लावला. मिकाला याच गोष्टीचा राग आला आणि त्याने चक्क तिला धडा शिकवण्यासाठीच सर्वांसमोर किस केलं. त्यानंतर राखीनं बाहेर जाऊन खूप गोंधळ घातला होता.

शूटिंग करतानाचा एक अनुभव सांगताना राखीने म्हटले की, ‘किसिंग सीन देताना मी काहीशी अस्वस्थ झाली होती. मला मिका सिंग आठवत होता.’ हा सीन करताना तब्बल ५५ रिटेक्स घ्यावे लागले. शूटिंगवेळी ती घटना मला सातत्याने आठवत होती. मी घाबरली होती. असे वाटत होते की, कोणीतरी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला असे अजिबातच वाटत नव्हते की, मी कॅमे-यासमोर अ‍ॅक्टिंग करते. मला असे वाटत होते की, हे सर्व काही पुन्हा एकदा माझ्यासोबत घडत आहे.’

टॅग्स :राखी सावंतमिका सिंग