Join us  

जेव्हा श्रद्धा कपूरच्या ‘छम छम...’ गाण्यावर अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवाल धरते ठेका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:00 AM

नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात श्रद्धा कपूर नव्हे तर अ‍ॅसिड सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल ही डान्स करताना दिसतेय. हा तिचा व्हिडीओ स्वत: श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहेत.

‘बागी’ या चित्रपटातून टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची जोडी आपण पाहिली. त्यांची केमिस्ट्री सर्व रसिकांना आवडली. अजूनही नेटिझन्स  टायगर-श्रद्धाची जोडी बेस्ट आहे असे म्हणतात. याच ‘बागी’ चित्रपटातील तिचे एक पावसातले गाणे तुम्हाला आठवतेय का? होय, तुम्ही बरोबर ओळखले, ‘छम..छम..’ हे गाणे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात श्रद्धा कपूर नव्हे तर अ‍ॅसिड सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल ही डान्स करताना दिसतेय. हा तिचा व्हिडीओ स्वत: श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहेत.

 श्रद्धा कपूर ही तिच्या वेगवेगळया डान्स नंबर्ससाठी ओळखली जाते. तिच्या अदा आणि तिचे जलवे हे आपण तिच्या गाण्यातून पाहतच असतो. ‘बागी’ या चित्रपटातील गाणे ‘छम छम...’ या गाण्यावर अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवालने जबरदस्त डान्स मूव्हज दाखवले आहेत. यामध्ये खूप चॅन डान्स केला आहे. ती श्रद्धाच्या स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ पाहून यूजर्स वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन देत आहेत. अनेक यूजर्स लिहीत आहेत, ‘आजचा सर्वात छान व्हिडीओ’. 

लक्ष्मी अग्रवालच्या या व्हिडिओला स्वत: श्रद्धा कपूरने आपल्या इंस्टा अकाउंटवर शेयर केले असून  तिने कॅप्शनमध्ये आनंद आणि हृदयाची इमोजी देखील बनवली आहे. डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ २२ लाखांपेक्षा जास्त वेळा पहिला गेला आहे. सॉन्ग 'छम छम...' फिल्म 'बागी' चे आहे, जे श्रद्धा कपूर आणि टाइगर श्रॉफ यांच्यावर चित्रित केले गेलेले आहे.

लक्ष्मी अग्रवाल अ‍ॅसिड अटॅक व्हिक्टीम आहे. त्यांची बायोपिक 'छपाक' बनवली जात आहे. यामध्ये दीपिका पदुकोण लीड रोलमध्ये दिसणार आहे. यासोबतच डिंपल गर्ल या फिल्मने प्रोड्यूसर म्हणून डेब्यू करत आहे. फिल्ममधून दीपिकाचा फर्स्ट लूक देखील बाहेर आला आहे. लक्ष्मीबद्दल बोलायचे तर ती सध्या एक टीव्ही शो होस्ट करत आहे आणि स्टॉप अ‍ॅसिड अटॅकचा प्रचार करत आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरदीपिका पादुकोण