Join us  

जेव्हा ड्रेसिंग स्टाइलची कॉपी करणे करिनाला पडले होते महागात, झाली होती ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 10:33 AM

करीनाने परिधान केलेल्या मॅटर्निटी आउटफिट्सवर नजर टाकली असता, तिचा हा अंदाज किम कार्दशियनवरुन इन्सपायर्ड असल्याचे लक्षात येते. करीनाचे काही लूक्स तर सेम टू सेम किमसारखेच होते.

बेबोनं एक प्रवास पूर्ण केलाय आणि तोही हिंदीतच जिथं ती बेबोपासून बनली बेगम. मात्र बेगम बनल्यानंतर वॉर्डरोब आणि स्टाइल स्टेटमेंटमध्ये काही फरक पडला नाही. पूर्वीप्रमाणेच तिने तिची स्टाइल मेंटेंन केल्याचे पाहायला मिळते. मुळात करिनाच्या स्टाइल स्टेटमेंट सर्वाधिक तिच्या प्रेग्नंसीदरम्यान लक्षवेधी ठरली. करिना दुस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. यावेळी तिच्या स्टायलिश कपड्यांवरुन ती चर्चेत असते. मात्र जेव्हा करिना पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा तिने तिची प्रेग्नंसी तिच्या स्टायलिश कपड्यांमुळेच ग्लॅमरस बनवली होती. मात्र त्याच स्टायलिश कपड्यांमुळेही ती ट्रोलही झाली होती. 

तिने प्रेग्नंसीदरम्यान एक ड्रेस परिधान केला होता. अतिशय सुंदररित्या तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली होती. मात्र जेव्हा तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा. करिनाने परिधान केलेला ड्रेस हॉलिवूड स्टार किम कार्दशियनसारखाच असल्यामुळे तिला कॉपी कॅटही ठरवले गेले होते. बघणा-या प्रत्येकाने तिच्या स्टाईलचे कौतुक तर केलेच, मात्र करीनाची ही स्टाईल तिची नसून किम कार्दशियनची कॉपी होती.

करीनाने परिधान केलेल्या मॅटर्निटी आउटफिट्सवर नजर टाकली असता, तिचा हा अंदाज किम कार्दशियनवरुन इन्सपायर्ड असल्याचे लक्षात येते. करीनाचे काही लूक्स तर सेम टू सेम किमसारखेच होते.  स्टायलिश लूकमुळे ओळखली जाणारी करिना तैमूरच्या जन्मानंतर ग्लॅमरस मॉम म्हणूनही ओळखली जाते. तिचे तैमुरसह सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून करिना कपूरलाही ग्लॅमरस मॉम म्हटले जाऊ लागले.

बेबो फिटनेस फ्रिक आहे हे तर जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.झिरो फिगरसाठी आणि सुंदर दिसण्यासाठी करिनाने केलेली मेहनतही सा-यांनाच माहिती आहे.

इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते. करिनाच्या चाहत्यांना वाटलं की नवाब सैफ अली खानची पत्नी झाल्यानंतर आता करिनाही नवाबी फुडकडे आकर्षित होईल मात्र असं झालं नाही. करिना तिचे मनपसंत फुड डिशच खाणे पसंत करते.

टॅग्स :किम कार्देशियनकरिना कपूर