Join us  

जुही चावलाचे या अभिनेत्यासोबत झाले होते पहिले लग्न, तिनेच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:37 PM

बॉलिवूडमधील एक अभिनेता जुहीच्या सौंदर्यावर फिदा झाला होता आणि जुहीने चक्क त्याच्यासोबत लग्न देखील केले होते.

ठळक मुद्देएकदा तर जुहीसोबत लग्न करण्यासाठी इम्रानने चक्क एक अंगठी आणली होती आणि ही अंगठी जुहीच्या हातात घातली होती. जुहीच्या हातात मी अंगठी घातली असून माझे आणि जुहीचे लग्न झाले असेच तो सगळ्यांना सांगत होता.

जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. 1995 मध्ये जुहीने प्रसिद्ध व्यवसायिक जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जुहीने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. जुहीच्या अभिनयासोबतच त्याकाळात तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तिच्या हास्यावर तर सगळेच फिदा होते. बॉलिवूडमधील एक अभिनेता देखील जुहीच्या सौंदर्यावर फिदा झाला होता आणि जुहीने चक्क त्याच्यासोबत लग्न देखील केले होते.

जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते... हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण तिचे लग्न काही खरेखुरे झाले नव्हते. तिचा एक छोटासा फॅन तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. एवढेच नव्हे तर त्याने तिच्यासाठी एक अंगठी घेतली होती आणि ही अंगठी तिच्या हातात घातली होती. अंगठी घातल्याने जुहीसोबत त्याचे लग्न झाले असा या चाहत्याचा समज होता.

जुहीचा हा छोटासा चाहाता आणखी कोणी नसून आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान आहे. आमिर आणि जुहीने त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आमिर आणि जुहीची खूप चांगली मैत्री आहे. इम्रान हा आमिरचा लाडका असल्याने आमिरच्या काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. जो जिता वही सिकंदर या चित्रपटात आमिरच्या लहानपणाची भूमिका त्यानेच साकारली होती. इम्रान आमिरच्या चित्रपटात नसला तरी अनेक वेळा आमिरच्या चित्रीकरणासाठी आवर्जून जायचा. जुहीच्या आणि आमिरच्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळी इम्रान यायचा. त्याला जुही तेव्हा प्रचंड आवडायची. तो चित्रपटाच्या सेटवर आल्यावर आमिरपेक्षा जुहीसोबतच जास्त वेळ घालवायचा. जुहीच्या तो अक्षरशः प्रेमात पडला होता आणि त्याने जुहीला लग्नाची मागणी देखील घातली होती आणि जुहीने देखील ही मागणी मान्य केली होती.

एकदा तर जुहीसोबत लग्न करण्यासाठी इम्रानने चक्क एक अंगठी आणली होती आणि ही अंगठी जुहीच्या हातात घातली होती. जुहीच्या हातात मी अंगठी घातली असून माझे आणि जुहीचे लग्न झाले असेच तो सगळ्यांना सांगत होता. तीन-चार दिवस तरी जुहीने ही अंगठी तिच्या हातात ठेवली होती. पण नंतर जुहीपेक्षा ही अंगठी मी दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला देईन असा विचार करत इम्रानने ही अंगठी तिच्याकडून परत घेतली होती. या घटनेमुळे माझे पहिले लग्न इम्रान सोबत झाले आहे असे जुही अनेक वेळा सगळ्यांना मस्करीत सांगते.

टॅग्स :जुही चावला इमरान खान