Join us  

आनंदमध्ये न घेतल्यामुळे या अभिनेत्याने दारूच्या नशेत फोन करून हृषिकेश मुखर्जी यांना रात्रभर सतवले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 1:42 PM

राजेश खन्ना यांच्या करियरमधील सगळ्यात चांगल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देया चित्रपटाची कथा सुरुवातीला हृषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र यांना ऐकवली होती आणि हा चित्रपट आपण लवकरच बनवूया असे सांगितले होते.

‘आनंद’ हा चित्रपट एक यादगार सिनेमा आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या सुपरहिट जोडीच्या अभिनयाने सजलेल्या 70 च्या दशकातील या सुपरहिट सिनेमाच्या आठवणी आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत. या चित्रपटाला आज 50 वर्षं पूर्ण झाली. 

आनंद या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील राजेश खन्ना यांचे काम तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. राजेश खन्ना यांची बाबूमोशाय बोलण्याची स्टाईल तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. 

राजेश खन्ना यांच्या करियरमधील सगळ्यात चांगल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाची कथा सुरुवातीला हृषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र यांना ऐकवली होती आणि हा चित्रपट आपण लवकरच बनवूया असे सांगितले होते. पण ऐनवेळी हृ्षिकेश मुखर्जी यांनी राजेश खन्ना यांना या चित्रपटात घेतले. या चित्रपटात मुख्य भूमिका राजेश खन्ना साकारणार आहेत हे कळल्यावर धर्मेंद्र यांना खूप वाईट वाटले होते. त्यांनीच ही गोष्ट द कपिल शर्मा या कार्यक्रमात सांगितली होती.

द कपिल शर्मा या कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, आम्ही बंगलूरुवरून परतत असताना हृषिदा यांनी मला कथा ऐकवली होती आणि आपण यावर लवकरच काम करूया असे सांगितले होते. पण काही दिवसांनी मला कळले की, राजेश खन्ना यांना घेऊन या चित्रपटाचे चित्रीकरण देखील हृषिदा यांनी सुरू केले आहे.

धर्मेंद्र यांनी पुढे सांगितले की, मला हे कळल्यावर मी दारू पिऊन हृषिदा यांना रात्रभर फोन केले होते. मी हृषिदा यांना रात्रभर झोपून दिले नव्हते. तुम्ही मला कथा ऐकवली, मला या चित्रपटात घेणार असे सांगितले होते. मग त्याला या चित्रपटात का घेतले असे मी त्यांना फोन करून सतत विचारत होतो. त्यावर धर्म तू झोप... आपण यावर उद्या बोलूया असे हृषिदा मला सांगून फोन ठेवत होते आणि मी त्यांना पुन्हा फोन करत होतो. पण मी त्यांना फोन करून पुन्हा तीच गोष्ट विचारत होतो. 

टॅग्स :धमेंद्रराजेश खन्ना