Join us

​रणबीरबद्दल विचारल्यावर का खवळली श्रुती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:42 IST

श्रुती हासन आणि रणबीर कपूर यांच्या लिंकअपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. कॅटरिना कैफपासून विभक्त झाल्यानंतर रणबीर श्रुतीमध्ये गुंतला आणि ...

श्रुती हासन आणि रणबीर कपूर यांच्या लिंकअपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. कॅटरिना कैफपासून विभक्त झाल्यानंतर रणबीर श्रुतीमध्ये गुंतला आणि जरा जास्तच गुंतला, अशा बातम्या अलीकडे कानावर आल्या. रणबीर यावर काही बोलला नाही. पण श्रुतीने मात्र या मुद्यावर आपली चुप्पी तोडली आहे. श्रुतीला रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारला गेला. यावर श्रुती चांगलीच खवळली. या सगळ्या बातम्या बकवास आहेत. या बातम्यांचा अर्थच मला कळलेला नाही. यात काहीही तथ्य नाही. सध्या मी माझ्या कामात अतिशय व्यस्त आहे आणि अशा बकवास बातम्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही, असे ती म्हणाली. अशा बातम्यांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवणार नाही, असेही ती म्हणाली.रणबीर व श्रुती एका अ‍ॅड शूटच्या निमित्ताने मुंबईत भेटले होते. या एकाच भेटीत रणबीर व श्रुती एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि मग काहीच दिवसांत त्यांच्या लिंकअपच्या बातम्या चर्चेचा विषय झाल्या. तूतार्स श्रुती ‘शाबास नायडू’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती तिच्या वडिलांसोबत म्हणजेच कमल हासन यांच्यासोबत प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहे.