Join us

वाचा असे काय घडले होते की, रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उचलला होता एका व्यक्तीवर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 17:05 IST

यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाचं शुटींग राजस्थानमधील जयपूरमध्ये सुरू होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांना पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती.

बॉलिवूडच्या काही प्रेमकथांची चर्चा आजही रंगते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी त्यापैकीच एक. खरे तर रेखा यांचे नाव अनेकांशी जोडले गेले. पण अमिताभ व रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होते. म्हणूनच आजही कुठल्या समारंभात रेखाची एन्ट्री झाली की, पाठोपाठ मीडियाचे कॅमेरे अमिताभ यांचे हावभाव टिपण्यासाठी वळतात. असे म्हणतात की, रेखा अमिताभवर जीवापाड प्रेम करायच्या. ‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमाचे शूटींग सुरू असताना अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची कुणकुण मीडियाला लागली आणि या लव्हस्टोरीबद्दलच्या अनेक बातम्या रंगू लागल्या.

तुम्हाला माहीत आहे का, रेखा यांच्यावर अश्लील कमेंट केल्यामुळे अमिताभ यांनी एका व्यक्तीला काही वर्षांपूर्वी चांगलाच चोप दिला होता. या गोष्टीची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती. 

यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना 1977 मध्ये घडली होती. ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाचं शुटींग राजस्थानमधील जयपूरमध्ये सुरू होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांना पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. आणि अशातच एका व्यक्तीने रेखा यांच्यावर अश्लील कमेंट केली. त्याला अनेकवेळा समजावून सांगण्यात आलं. पण तरीदेखील तो शांत बसतच नव्हता. अमिताभ यांना या गोष्टीचा प्रचंड राग आला होता. अखेरीस त्याला अमिताभ यांनी बेदम चोप दिला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना या प्रकरणात मध्यस्ती करावी लागली होती. या घटनेनंतर त्या दोघांच्या अफेयरच्या चर्चांनी अजूनचं जास्त जोर धरला होता.

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखा