आराध्या जेव्हा रणबीरला ‘बाबा’ म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 19:25 IST
ऐश्वर्या राय बच्चन व रणबीर कपूर यांच्या इंटीमेट सीनमुळे बच्चन कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. आता खुद्द ऐश्वर्याने आणखी एक ...
आराध्या जेव्हा रणबीरला ‘बाबा’ म्हणते...
ऐश्वर्या राय बच्चन व रणबीर कपूर यांच्या इंटीमेट सीनमुळे बच्चन कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. आता खुद्द ऐश्वर्याने आणखी एक खुलासा करून बच्चन कुटुंबियाची आणखीनच अडचण करुन ठेवलीय. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीरसोबतची केमेस्ट्री पाहून ऐश्वर्या व अभिषेकची मुलगी आराध्याही गोंधळात पडली. अभिषेक बच्चन ऐवजी आराध्या ही रणबीर कपूरला ‘बाबा’ समजली होती. एका कार्यक्रमात तिने हा किस्सा सांगितला. करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर व ऐश्वर्या राय यांनी हॉट फोटोशूट केले. याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याच फोटोशूट दरम्यान दिलेल्या इंटरव्ह्यूत तिने मुलगी आराध्याने रणबीरला बाबा समजल्याचे सांगितले. ऐश्वर्या म्हणाली, रणबीरने अभिषेकप्रमाणे गेटअप केला होता. त्याचा लूकही थोडाफार अभिषेकशी मिळता जुळता आहे. रणबीर अभिषेकप्रमाणे जॅकेट व टोपी घालून आला होता. आराध्याने दुरून रणबीरला पाहिले. हा आपला बाबा असल्याचे तिला वाटले व ती धावत जावून रणबीरला जाऊन बिलगली. रणबीरचा चेहरा पाहून सुरुवातीला आराध्या थोडी गोंधळली होती. आता दोघांत चांगली मैत्री झाली असून, ती रणबीरला ‘आरके’ म्हणून हाक मारते असेही ऐश्वर्याने सांगितले. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांनी २००७ साली विवाह केला. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. आराध्या आपल्या आईसह अनेक ठिकाणी दिसते. ऐश्वर्या राय बच्चन ही ‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटात रणबीर कपूरच्या अपोझिट दिसणार असून, यात दोघांच्या इंटीमेट सीनमुळे चर्चेत आला आहे.