Join us

WHAT?? ​सुशांत सिंग राजपूतच्या ‘मूड स्विंग’मुळे त्रासले क्रू मेंबर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 10:26 IST

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान सध्या अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोही ...

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान सध्या अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोही आपण पाहिले आहेत. सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानचा हा डेब्यू सिनेमा असल्याने निश्चितपणे या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय. पण या चित्रपटाच्या शूटींगमध्ये वारंवार एक अडचण येतेय. होय, ही अडचण कुठली तर सुशांत सिंग राजपूत. आश्चर्य वाटले ना, पण सूत्रांचे मानाल तर हे खरे आहे.होय, सुशांतच्या क्षणा-क्षणाला बदलणाºया मूडमुळे म्हणजेच मूड स्विंगमुळे म्हणे शूटींगचा खोळंबा होऊ लागला आहे. या मूड स्विंगमुळे सुशांतचे चित्रपटाच्या क्रू मेंबर्सशी वारंवार खटके उडताहेत. मेकर्सला शूटींग वेळेत पूर्ण करायचे आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘केदारनाथ’च्या शूटींगचे दुसरे शेड्यूल मेकर्सला सुरुवात करायची होती. पण ते आता लांबलेय. दुसºया शेड्यूलची सगळी तयारी पूर्ण झाली होती. पण ऐनवेळी सुशांतने पुन्हा तारखांची अदलाबदल केली. मेकर्ससाठी हे सगळे धक्कादायक होते.काही दिवसांपूर्वीच सुशांतने ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटाला ऐनवेळी नकार दिला होता.  या चित्रपटाचे फर्स्ट लूकही जारी झाले होते. पोस्टरला लोकांचा चांगला रिस्पॉन्सही मिळाला होता. पण सुशांतने शूट सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाला नकार कळवला. विशेष म्हणजे, या नकारामागचे कारणही त्याने सांगितले नाही.यामुळे या चित्रपटाचे प्रोड्यूसर बंटी वालिया कमालीचे भडकले होते. सुशांतचे वागणे योग्य नाही, असे बंटी वालिया म्हणाले होते.ALSO READ: सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यात आली नवी गर्लफ्रेंड ?सुशांत सिंह राजपूतला खरे तर बॉलिवूडमध्ये येऊन फार काळ झाला नाही. अगदीर बोटांवर मोजता येईल इतकेच त्याचे सिनेमे. पण तरिही साहेबांचा तोरा एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. सुशांत कायम ‘नो नॉनसेन्स रूल’ फॉलो करताना दिसतो. एखादी गोष्ट आवडली नाही की, तो अगदी लगेच रिअ‍ॅक्ट होतो. म्हणूनच काही लोक त्याला ‘शॉर्ट टेम्पर्ड’ही म्हणतात. सध्या सुशांत त्याच्या याच स्वभावामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भररस्त्यात एका कारचालकाशी हुज्जत घातली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.