शाहरूख हे काय??
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 20:09 IST
एका लोकप्रीय ब्रॅण्डच्या नवीन जाहिरातीत शाहरूख दिसतो आहे. या जाहिरातीत शाहरूख चक्क दरवाज्याचा नॉट चाटतांना दिसत आहे.
शाहरूख हे काय??
किंगखान शाहरूख खान म्हणजे खणखणतं नाणं. म्हणूनच मोठ मोठे ब्रॅण्ड शाहरूखला आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत घेण्यास उत्सूक असतात. फेस क्रिमपासून तर घड्याळ्यांपर्यंत, मोटारींपासून शितपेयांपर्यंतच्या अनेक जाहिरातीत शाहरूख दिसतो आहे. अनेक ब्रॅण्डचा तो ब्रॅण्ड अॅम्बिसीडरही आहे. आता अशाच एका लोकप्रीय ब्रॅण्डच्या नवीन जाहिरातीत शाहरूख दिसतो आहे. या जाहिरातीत शाहरूख चक्क दरवाज्याचा नॉट चाटतांना दिसत आहे. ही जाहिरात विचित्र आहे खरे, पण हा केवळ जाहिरातीचा एक भाग आहे. पण तरिही शाहरूख आणि दरवाज्याचा नॉब चाटतोयं, म्हणजे काही तरीच...तेव्हा बघा तर!!!