Join us  

काय सांगता! आयुषमान खुराणाचा भाऊ जाणार ५ वर्षांसाठी जेलमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 10:53 AM

आयुषमान खुराणा असा अपवादात्मक बॉलीवूड सेलिब्रेटी आहे जो वादविवाद, अफे यर्स, स्कँडल्सपासून चार हात दूरच राहतो. कोणत्याच नकारात्मक बातम्यांत ...

आयुषमान खुराणा असा अपवादात्मक बॉलीवूड सेलिब्रेटी आहे जो वादविवाद, अफे यर्स, स्कँडल्सपासून चार हात दूरच राहतो. कोणत्याच नकारात्मक बातम्यांत तो दिसून येत नाही. खासगी आयुष्य आणि इमेज जीवापाड जपणाऱ्या आयुषमानला मात्र त्याच्या लहान्या भावामुळे चांगलीच मान खाली घालावी लागली.अपारशक्ती हा आयुषमानचा भाऊ असून ‘दंगल’द्वारे तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. आता कुठे त्याच्यासाठी चंदेरी दुनियेचे दरवाजे उघडत होते की, त्याआधीच तो एका मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबई विमानतळावर पोलिसांशी हुज्जत घालून निषिद्ध असलेल्या भागात प्रवेश केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.सुत्रांनुसार, विमानतळावर सामान हरवल्यामुळे चिडलेल्या अपारशक्तीने ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’तील पोलिसांशी भांडण केले. नंतर त्याने प्रतिबंधित भागात प्रवेश केला. काही प्रवाशांच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडून सहारा विमानतळ पोलिस ठाण्यात ठेवले. वर्दीतील सुरक्षा अधिकाऱ्यांना मारहाण व धमकी देण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.आयुषमानच्या वकिलाने त्याच्या भावाला अटके तून सोडविण्यासाठी खूप प्रयत्न केले  स्वत: आयुषमानने भावाच्या दुर्वर्तनाबद्दल अधिकाऱ्यांशी माफी मागितली. तेव्हा कुठे ३० तासानंतरच त्याला जामीन मिळाला. अपारशक्तीला नोटीस बजावण्यात आली असून त्याला कोर्टाच्या तारखेला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला तीन ते पाच वर्षे जेलची हवा खावी लागू शकते.आमिर खानच्या दंगलमध्ये तो एक महत्त्वाच्या भूमिकेतून डेब्यू करीत आहे. रेडिओ जॉकी असणारा अपारशक्ती वरुण धवन-आलिया भट्ट स्टारर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्येसुद्धा दिसणार आहे. रुपेरी पडद्याचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या आधीच मोठ्या प्रकारणात अडकल्यामुळे त्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.