Join us  

असं काय झालं की, काजोल अचानक करू लागली भांगडा; जाणून घेण्यासाठी वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:45 PM

खुद्द तिचा पती अजय देवगणचीही भीतीही ती मनात बाळगत नाही. आता तुम्ही म्हणाल, असे काय केले काजोलने? नेमकं असं काय झालं की, काजोल अचानक भांगडा करू लागली? असे तुम्हाला वाटले असेल.

काजोल ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट ताबडतोब करून टाकते. खुद्द तिचा पती अजय देवगणचीही भीतीही ती मनात बाळगत नाही. आता तुम्ही म्हणाल, असे काय केले काजोलने? नेमकं असं काय झालं की, काजोल अचानक भांगडा करू लागली? असे तुम्हाला वाटले असेल..त्याचं झालं असं की, तिचे नुकतेच इन्स्टाग्रामवर १० मिलियन म्हणजेच १ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. त्या आनंदात तिने चक्क भांगडाच करायला सुरूवात केली. 

सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्व सेलिब्रिटी आपापल्या घरी विविध अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये मन रमवत आहेत. सेलिब्रिटी रोजच काही ना काही व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. आता काजोलनेही तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. बरं...आता त्याचं कारण काय? तर तिने इन्स्टाग्रमावर १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याने तिने हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील असून ती या व्हिडीओत भांगडा करताना दिसत आहे. ती अत्यंत खुश आहे. तिने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की,‘हा आनंद माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी आहे, तुमचीच काजोल’ 

काजोलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, नुकतीच ती ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दिसली होती. तिचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला होता. यात तिची आणि अजयची जोडी फारच क्यूट दिसत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे  सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

टॅग्स :काजोलअजय देवगणइन्स्टाग्राम