WHAT?? आयब्रोजवरून ट्रोल झाली फातिमा सना शेख!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 13:17 IST
जायरा वसीमनंतर ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख ही सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अर्थात फातिमा जायरासारख्या कुठल्याशा वादामुळे नाही तर आपल्या आयब्रोजमुळे चर्चेत आली आहे.
WHAT?? आयब्रोजवरून ट्रोल झाली फातिमा सना शेख!!
जायरा वसीमनंतर ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख ही सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अर्थात फातिमा जायरासारख्या कुठल्याशा वादामुळे नाही तर आपल्या आयब्रोजमुळे चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, फातिमाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत फातिमाच्या उजव्या भुवयीवर एक कट दिसतोय. यावरून युजर्सने तिला ट्रोल करणे सुरु केले आहे. फातिमाने आयब्रो शेव केलीयं, असे काहींनी म्हटले आहे तर काहींनी याला ‘गजनी इफेक्ट्स’चे नाव दिले आहे. अर्थात अनेकांनी फातिमाच्या या फोटोची तारीफही केलीयं. काही युजर्सनी फातिमाची ‘भविष्यातील कॅटरिना’ अशा शब्दांत प्रशंसा केली तर काहींनी हा तिच्या आगामी सिनेमातील लूक असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. आता खरे काय, हे फातिमालाच ठाऊक़ कारण अद्याप खरे काय ते फातिमाने स्पष्ट केलेले नाही. ट्रोलर्सलाही अद्याप तिने काही उत्तर दिलेले नाही. तसेही ट्रोल होण्याची तिची ही पहिली वेळ नाही. याआधीही फातिमा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.ALSO READ : फातिमा सना शेखचा वेगळाच तोरा! म्हणे, माझी कुणाशीही तुलना करू नका!!अलीकडे फातिमाने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला होता. यात फातिमा साडीत दिसली होती. अर्थात तिची साडी नेसण्याची त-हा जरा अजब होती. या फोटोला फातिमाने ‘शेमलेस सेल्फी’ असे वादग्रस्त कॅप्शन दिले होते. ‘शेमलेस सेल्फी’प्रकरणावरून युजर्सनी तिला ट्रोल केले होते. त्यापूर्वी तिने रमझानच्या पवित्र महिन्यात स्वत:चा एक बिकनी फोटो शेअर केला होता. यावरून मोठा वाद उठला होता. या फोटोवरून अनेक युजर्सनी फातिमाला फैलावर घेतले होते. लवकरच फातिमा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये झळकणार आहे. यात ती आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटानंतर आमिरचा ड्रिम प्रोजेक्ट ‘महाभारत’ यातही फातिमा दिसणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.