काय म्हणता? सलमान खानची एनजीओ ‘बीर्इंग ह्युमन’ काळ्या यादीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:51 IST
एकीकडे सलमान खानचे चित्रपट गाजत असताना दुसरीकडे सलमान त्याच्या ‘सोशल वर्क’मुळेही चर्चेत आहे. सन २००७ पासून सलमानच्या ‘सोशल वर्क’ची ...
काय म्हणता? सलमान खानची एनजीओ ‘बीर्इंग ह्युमन’ काळ्या यादीत?
एकीकडे सलमान खानचे चित्रपट गाजत असताना दुसरीकडे सलमान त्याच्या ‘सोशल वर्क’मुळेही चर्चेत आहे. सन २००७ पासून सलमानच्या ‘सोशल वर्क’ची बरीच चर्चा सुरु झालीयं. याचे कारण म्हणजे, यावर्षी सलमानने ‘बीर्इंग ह्युमन’ ही एनजीओ स्थापन केली होती. पण आता ‘सोशल वर्क’ करणारी सलमानची ही एनजीओच वांद्यात सापडली आहे. होय, मुुंबई महानगर पालिकेने ‘बीर्इंग ह्युमन’ला काळ्या यादीत टाकले आहे. ‘बीर्इंग ह्युमन’ने पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर एनजीओला कारणे द्या नोटीसही बजावण्यात आले आहे.मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बीर्इंग ह्युमन’ने मुंबईच्या एका भागात डायलिसीस युनिट लावायचे होते. याद्वारे गरिबांना माफक दरात उपचार मिळू शकले असते. पण ‘बीर्इंग ह्युमन’ हे युनिट्स लावण्यात अपयशी ठरले. डिसेंबर २०१६ मध्ये मुंबई महापालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत १९९ डायलिसीस युनिट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. यापैकी २४ युनिट ‘बीर्इंग ह्युमन’ उभारणार होते. पण निश्चित कालमर्यादेत ‘बीर्इंग ह्युमन’ हे युनिट लावण्यात अपयशी ठरले. मुंबई महापालिकेच्या अधिकाºयांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. यासंदर्भात सलमानच्या एनजीओला नोटीस जारी करण्यात आल्याचे शिवाय या प्रोजेक्टसाठी ‘बीर्इंग ह्युमन’ने जी रक्कम जमा केली होती, ती सुद्धा जप्त करण्यात आल्याचे या अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान एनजीओची प्रवक्ता लोरेटा लुईस यांनी याबद्दल आपली बाजू मांडली आहे. मुंबई महापालिकेसोबत अधिकृतरित्या आमचा कुठलाही करार झाला नव्हता. या प्रोजेक्टसंदर्भात आमच्या काही अटी होत्या. त्यावर चर्चा सुरु होती, असे त्यांनी सांगितले.ALSO READ : सलमान खानचे पापा सलीम खान यांनी ६० वर्षांनंतर उघड केले एक ‘रहस्य’!मुंबईच्या दहिसर भागात शिवम रूग्णालय चालवणारी एनजीओ ५० रूपयांत डायलिसीस सेवा उपलब्ध करून देते. याऊलट महापालिकेच्या रूग्णालयांत यासाठी रूग्णास ३५० रूपये मोजावे लागतात. हा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने अन्य एनजीओकडून निविदा मागवल्या होत्या. सलमानच्या एनजीओने यासाठी निविदा भरली होती. सलमानची एनजीओ ‘बीर्इंग ह्युमन’ गरिबांच्या उपचाराचा खर्च उचलते. सलमान आपल्या क्लोदिंग ब्रांडच्या माध्यमातूनही आपल्या या फाऊंडेशनसाठी पैसा उभारतो. दरवर्षी या फाऊंडेशनच्या माध्यमातून शेकडो गरिबांचा उपचार केला जातो.