Join us  

​काय म्हणता? ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ जॉन अब्राहमला ११ कोटी रूपये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 9:35 AM

जॉन अब्राहम दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. (नाही म्हणायला, त्याचा ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ येत्या ९ एप्रिलला ...

जॉन अब्राहम दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. (नाही म्हणायला, त्याचा ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ येत्या ९ एप्रिलला रिलीज होतोय.)’ पण म्हणून जॉनची डिमांड कमी झालेय, असे मात्र मुळीच नाही. असे असते तर जॉनला एका चित्रपटासाठी ११ कोटी रूपयांची फी मिळाली नसती.होय, चर्चा खरी मानाल तर,‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटासाठी जॉनला ११ कोटी रूपये मानधन मिळाले आहे. जॉनकडे हा प्रस्ताव आला तेव्हा त्याने १२ कोटींची मागणी केली होती. पण मेकर्सने ११ कोटीत ही डिल फायनल केली. खरे तर जॉनचे ‘फोर्स2’ आणि ‘रॉकी हँडसम’ हे अलीकडे आलेले दोन्ही सोलो चित्रपट फ्लॉप झाले होते. तरिही ‘रोमिओ अकबर वॉल्टर’च्या मेकर्सनी जॉनला ११ कोटी द्यावेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, रॉबी गरेवाल यांनी. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी ‘व्हेन टाइम स्ट्राइक्स’,‘एम पी3: मेरा पहला पहला प्यार’ आणि ’आलू चाट’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांचा ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतचे नाव फायनल झाले होते. त्याच्यासोबतचे चित्रपटाचे पहिले पोस्टरही लॉन्च झाले होते. पण नंतर डेट्सच्या अडचणीमुळे ऐनवेळी सुशांतने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि हा चित्रपट जॉनच्या झोळीत पडला.ALSO READ : जॉन अब्राहमसोबत जमणार ‘या’ सुपरमॉडेलची जोडी!‘रोमिओ अकबर वॉल्टर’चे निर्माते अजय कूपर यांनी सांगितले की, जॉन या चित्रपटाशी जुळला, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. त्याचे नाव अनेक विचारांशी फायनल करण्यात आले. त्यालाही चित्रपटाची कथा आवडली आणि त्यानेही लगेच होकार दिला. या चित्रपटाची कथा १९७० च्या दशकातील आहे. नेपाळ, गुजरात, श्रीनगर, दिल्ली येथे चित्रपटाचे शूटींग होणार आहे. यात जॉन अब्राहम एका अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. यासाठी नॅशनल अवार्ड विनर मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड आणि कॉस्च्युम डिझाईनर अमीरा पुलवानी हे जॉनला हा लूक देणार आहेत.