Join us  

आणि अजय देवगणने घेतली आलोकनाथची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 12:28 PM

दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोक नाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता अजय आलोकनाथची बाजू घेताना दिसला.

ठळक मुद्देआलोक नाथवर ज्यावेळी हा आरोप लागला होता. त्याच्याआधीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. या मुद्दावर बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये असे म्हणत अजय देवगणने हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. 

अजय देवगणच्यादे दे प्यार दे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. अजय देवगणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने त्याच्या चाहत्यांना ही भेट दिली. हा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. पण हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे. कारण या ट्रेलरमध्ये आपल्याला अजय देवगणसोबतच तब्बू, जावेद जाफ्री आणि आलोकनाथ यांना पाहायला मिळत आहे. 

दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलोकनाथला पाहताच प्रेक्षकांनी याबाबत सोशल मीडियावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आलोक नाथवर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला होता. मीटूमध्ये अडकलेल्या अभिनेत्याला चित्रपटात संधी कशी दिली असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोकनाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता अजय आलोक नाथची बाजू घेताना दिसला. त्याने मीडियाला सांगितले की, आलोक नाथवर ज्यावेळी हा आरोप लागला होता. त्याच्याआधीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. या मुद्दावर बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये असे म्हणत अजय देवगणने हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. 

सोशल मीडियावर दे दे प्यार दे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यावर तर अजय देवगण आणि या चित्रपटाचे निर्माते भुषण कुमार यांना लोकांनी विविध प्रश्न विचारत ट्रोल केले आहे. आलोकनाथवर इतके गंभीर आरोप असताना देखील तुम्ही त्याच्यासोबत काम कसे करतायेत असे त्यांना विचारले जात आहे. एवढेच नव्हे तर आलोकनाथला वेगळा न्याय आणि मी टू प्रकरणात अडकलेल्या इतरांना वेगळा न्याय का दिला जात आहे. 

 

दे दे प्यार दे हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार असा अंदाज लावला जात आहे. हा चित्रपट १७ मे ला प्रदर्शित होणार असून अकीव अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

टॅग्स :अजय देवगणआलोकनाथदे दे प्यार देमीटू