Join us

​विराट कोहली अन् अनुष्का शर्मा यांच्यात चाललेयं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 11:58 IST

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते बरेच जुने आहे. या कलेक्शनमधील सध्याची सर्वाधिक चर्चीत कपल म्हणजे, विराट कोहली अन् अनुष्का शर्मा. ...

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते बरेच जुने आहे. या कलेक्शनमधील सध्याची सर्वाधिक चर्चीत कपल म्हणजे, विराट कोहली अन् अनुष्का शर्मा. होय, भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली अन् बॉलिवूडच्या टॉप अ‍ॅक्ट्रेसच्या यादीतील अनुष्का शर्मा यांचे कनेक्शन चांगलेच खास आहे. ‘विरूष्का’ नावाने ओळखल्या जाणा-या या जोडीचे प्रेम आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. खरे तर विराट व अनुष्काने ते कधीही लपवलेही नाही. त्यामुळेच विराट व अनुष्काची जोडी जेव्हा केव्हा एकत्र दिसते तेव्हा, त्यांचा क्यूट फोटो इंटरनेटवर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मंगळवारी असेच काही झाले. मंगळवारी रात्री गुलाबी रंगाच्या लाच्यातील अनुष्का अन् काळ्या रंगाच्या शेरवानीतील विराटचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. विराट अनुष्काकडे पाहतोय आणि अनुष्का गोड लाजतेय, अशा या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.आता हा फोटो कुठला, हे तर तुम्हाला कळायला हवेच ना? तर तेच! अनुष्का व विराटचा हा सुंदर फोटो कुण्या लग्नातला वा इव्हेंटमधला नाही तर एका जाहिरातीच्या शूटींगचा आहे. अनुष्का व विराटने दोघांनीही एकत्र एका जाहिरातीचे शूट केले आणि याच सेटवरचे काही फोटो लीक होत व्हायरल झालेत. अलीकडे विराट व अनुष्का दोघेही न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले होत. यादरम्यानची एक सेल्फी विरूष्काने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर ही जोडी श्रीलंकेतही दिसली होती.ALSO READ : विराट कोहली व अनुष्का शर्माच्या न्यूयॉर्क व्हॅकेशनचे फोटो तुम्ही पाहिलेत?विराट व अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु आहे. २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते.