Join us  

ऐश्वर्या रायच्या मोबाईल कव्हरवरील ‘ARB’ चा हा आहे अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 6:30 AM

ऐश्वर्याचा हा फोटो तुम्ही व्यवस्थितपणे पाहिला तर या मोबाईलच्या कव्हरवर ARB ही तीन अक्षरं लिहिलेली असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत.

ठळक मुद्देया शब्दांचा अर्थ काय आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून याचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन आहे असे म्हटले जात आहे. तिचे हे मोबाईल कव्हर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ऐश्वर्याने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे अनेक चित्रपट हिट ठरले असून तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्या काळात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होत असे. २०१८ मध्ये ऐश्वर्याचा ‘फन्ने खां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या दिसली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण याचे श्रेय ऐश्वर्याऐवजी, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरला मिळाले. ऐश्वर्या सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. ऐश्वर्या तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

ऐश्वर्या चित्रपटात काम करत नसली तरी ती अनेक फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते. तसेच तिला अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते. ऐश्वर्याला नुकतेच तिची मुलगी आराध्यासोबत पाहाण्यात आले. त्यावेळेचा प्रसारमाध्यमांनी काढलेला त्या दोघींचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे रंगली आहे. कारण या फोटोत आपल्याला ऐश्वर्याच्या हातात तिचा मोबाईल पाहायला मिळत आहे. हा फोटो तुम्ही व्यवस्थितपणे पाहिला तर या मोबाईलच्या कव्हरवर ARB ही तीन अक्षरं लिहिलेली असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. या शब्दांचा अर्थ काय आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून याचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन आहे असे म्हटले जात आहे. तिचे हे मोबाईल कव्हर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

21 एप्रिल 2007 ला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी लग्न केले. अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न बी टाऊनमधील सर्वात मोठा सोहळा होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडसोबतच, राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटर्स सहभागी झाले होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. ऐश-अभी दोघे आपल्या संसारात आनंदी असून ते नेहमीच मीडियात एकमेकांचे कौतुक करत असतात.

  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन