Join us

Watch Video : मामा सलमान खानप्रमाणेच जिममध्ये घाम गाळतोय भाचा आहिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 18:55 IST

​बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर सलमान खान आपल्या फिटनेसप्रती किती जागरूक असतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर सलमान खान आपल्या फिटनेसप्रती किती जागरूक असतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच त्याची गणना जगातील सर्वाधिक सेक्सी पुरुषांमध्ये केली जात असून, बॉलिवूडमध्ये त्याला टक्कर देणारा सध्या तरी दुसरा कोणी नाही. मात्र सलमानला टक्कर देण्यासाठी एक चिमुकला सध्या जिममध्ये चांगलाच घाम गाळताना दिसून येत आहे. हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणीही नसून, सलमानचाच भाचा आहिल आहे. आता तुम्ही म्हणाल की, एवढ्याशा वयात आहिलचा अन् जिमचा काय संबंध? मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये आहिल पप्पा आयुष शर्मासोबत दररोज जिममध्ये जात असून, पप्पांप्रमाणे कसरत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सलमानची बहीण अर्पिता हिचा पती आयुष शर्मा जिममध्ये एक्झरसाइज करताना दिसत आहे. त्याच्यासोबत चिमुकला आहिलदेखील कसरत करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. खरं तर आपल्याकडे ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हटले जाते. ही त्याची तर झलक नाही ना? असा विचार केल्यास वावगे ठरणार नाही. असो सध्या आहिलचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सलमानच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात बघितला जात आहे. आयुष शर्माने हा व्हिडीओ ‘न्यू वर्क आउट बडी’ या नावाने पोस्ट केला आहे.  सध्या आयुष शर्मा बॉलिवूड डेब्यूसाठी धडपड करीत आहे. सलमान खानच त्याला लॉन्च करीत असल्याने तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. शिवाय आपल्या लाडक्यालाही फिटनेसचे धडे देत आहे. मुंबई मिररने दिलेल्या एका वृत्तानुसार, सलमान खान आणि करण जोहर आयुषला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी प्लॅनिंग करीत आहेत. शिवाय असेही म्हटले जात होते की, आयुषच्या या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन जुलैमध्येच सुरू केले जाणार आहे. सलमानने याविषयावरच काही दिवसांपूर्वी करण जोहर यांची भेट घेतली होती. राजीव मसंद यांनी त्यांच्या एका आर्टिकलमध्ये लिहिले होते की, आयुषला सलमान खानच्या सुपरहिट ‘सुलतान’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून सहभागी करून घेतले होते. यासाठी आयुषची निवड करण्याचे एकच कारण होते, ते म्हणजे त्याला फिल्ममेकिंगविषयी माहिती मिळावी.