watch : वरूण धवनच्या ‘जुडवा2’चा फर्स्ट लूक आला...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 11:55 IST
वरूण धवन सध्या जोरात आहे. कालच वरूणच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील पहिले होली साँग लॉन्च झाले. या गाण्यामुळे ...
watch : वरूण धवनच्या ‘जुडवा2’चा फर्स्ट लूक आला...!
वरूण धवन सध्या जोरात आहे. कालच वरूणच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील पहिले होली साँग लॉन्च झाले. या गाण्यामुळे वरूणच्या चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली असतानाच आज ‘जुडवा2’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला. ‘जुडवा2’मध्ये वरूण अगदी हटके अंदाजात आहे. यात वरूण डबल रोल साकारतोय, हे तर तुम्हाला ठाऊक असणारच. होय, राजा आणि प्रेम. १९९७ मध्ये आलेल्या सलमान खान व करिश्मा कपूर यांच्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा ‘जुडवा2’ हा रिमेक आहे. ‘जुडवा’मध्ये सलमान खान याने राजा व प्रेम या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. आता वरूण या दोन्ही भूमिकांचे आव्हान पेलणार आहे. }}}}‘जुडवा’ला आज २० वर्षे पूर्ण झालेत. याच निमित्ताने ‘जुडवा2’चा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. यात वरूण दोन वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. एक म्हणजे साधा प्रेम आणि दुसरा म्हणजे टपोरी राजा. या चित्रपटात वरूणसोबत तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांची वर्णी लागलीय. विशेष म्हणजे सलमान व करिश्मा कपूर हे दोघेही यात कॅमिओ करताना दिसणार आहेत.मी या चित्रपटात स्वत:चे बेस्ट देऊ इच्छितो. कारण लोकांना या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहेत. सलमान खान, माझे वडील डेव्हिड धवन आणि प्रेक्षक यापैकी कुणालाही मी निराश करू इच्छित नाही. असे वरूणने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले होते.डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप ठरलन्ेली नही. पण याची पहिली झलक पाहून तुमची उत्सूकता नक्कीच वाढली असणार. होय ना?