watch trailer : मनीषा कोईरालाची ‘डिअर माया’मधून होणार दमदार वापसी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 12:29 IST
एकेकाळची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मनीषा कोईराला बॉलिवूडमध्ये धडाकेबाज वापसीसाठी तयार आहे. होय, मनीषा ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड वापसी करतेय. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे.
watch trailer : मनीषा कोईरालाची ‘डिअर माया’मधून होणार दमदार वापसी !
एकेकाळची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मनीषा कोईराला दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. २०१२ मध्ये ती ‘भूत रिटर्न्स’मध्ये दिसली होती. याचवर्षी मनीषाला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. या उपचारामुळे ती बॉलिवूडपासून दूर राहिली. २०१५ मध्ये आलेल्या ‘चेहरा : अ मॉडर्न डे क्लासिक’ या बॉलिवूडपटात मनीषा अखेरची दिसली होती. अर्थात फार कमी लोकांनी मनीषाचा हा चित्रपट बघितला होता. या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये धडाकेबाज वापसीसाठी मनीषा तयार आहे. होय, मनीषा ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड वापसी करतेय. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. ‘डिअर माया’ ही कथा आहे, मायाची. मायाची ही व्यक्तिरेखा मनीषाने साकारली आहे. म्हातारपणाने काहीशी खंगलेली माया एका मोठ्या घरात एकटी राहत असते. तिचे हे एकटेपण पाहून तिच्या शेजारी राहणाºया दोन मुलींना तिच्यासाठी काहीतरी करावे, असे वाटते. मग त्या दोघी एका अनोळखी व्यक्तिच्या नावे मायाला प्रेमपत्र लिहायला सुरुवात करतात. ही प्रेमपत्रं वाचून माया त्या अनोळखी व्यक्तिच्या प्रेमात पडते आणि त्याला शोधण्यासाठी बाहेर पडते. आपली सगळी संपत्ती विकून माया त्या व्यक्तिच्या प्रेमाचा शोध घेण्याचा निर्णय घेते. इकडे मायाला आनंदी पाहण्यासाठी हा सगळा खटाटोप करणाºया त्या दोन मुली स्वत:ला दोषी मानू लागतात. त्यांची मैत्री तुटते. सरतेशेवटी या दोन मुली मायाचे विखुरलेले आयुष्य पूर्ववत करण्यासाठी पुढे येतात.ALSO READ : मनीषा कोईराला बनणार संजय दत्तची ‘आई’!मनीषाच्या या आगामी चित्रपटाचे ट्रेलर चांगलेच दमदार आहे. यावर्षी २ जूनला हा चित्रपट रिलीज होतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला सांगायला विसरू नका.