Join us  

KGF Chapter 2 OTT Release: ‘केजीएफ 2’ आता घरबसल्या एन्जॉय करा, फक्त त्याआधी ‘हे’ एक काम करा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:27 AM

KGF Chapter 2 OTT Release: तुम्ही अद्यापही हा चित्रपट पाहिला नसेल आणि ओटीटी रिलीजच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, ‘केजीएफ 2’ ओटीटीवर रिलीज झाला आहे.

KGF Chapter 2 OTT Release:  रॉकिंग स्टार यशचा  ‘KGF 2’ रिलीज होऊन पाच आठवडे झालेत. मात्र अद्यापही या चित्रपटाची कमाई सुरू आहे. यशचा (Superstar Yash)हा सिनेमा रोज नवनवे विक्रम रचतोय. चित्रपटाने जगभरात 1200 कोटींची कमाई करत, एस एस. राजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. तुम्ही अद्यापही हा चित्रपट पाहिला नसेल आणि ओटीटी रिलीजच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, ‘केजीएफ 2’ ओटीटीवर रिलीज झाला आहे. अर्थात यासाठी 199 रूपये मोजण्याची तुमची तयारी हवी.‘केजीएफ 2’ आता तुम्ही प्राईम व्हिडीओवर बघू शकणार आहात.  कन्नड, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा भाषेत अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा उपलब्ध आहे. मुव्ही रेंटलसोबत, डिजिटल सब्सक्रिप्शनशिवाय हा सिनेमा तुम्ही पाहू शकणार आहात.

199 रूपये द्या आणि सिनेमा पाहाचाहते, 199 रूपये देऊन घरबसल्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर थेट हा सिनेमा बघू शकतील. यासाठी तुम्हाला प्राईमचे सब्सक्राइबर असण्याची गरज नाही. मुव्ही रेंटलसोबत 199 रूपये देऊन तुम्ही घरी या सिनेमाची आस्वाद घेऊ शकता. ‘केजीएफ 2’शिवाय  नवीन भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच जगभरातील चित्रपटांची निवड करून भाडे देऊन प्रेक्षक ते पाहू शकतात. हे भाडे भरल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कधीही तो सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल. मात्र एकदा पाहणं सुरू केल्यावर तो 48 तासांत पाहून संपवणे बंधनकारक आहे.

‘केजीएफ 2’ सूसाट‘केजीएफ 2’ने 5 आठवड्यात जगभरात एकूण 1200.76 कोटींची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 427.05 कोटींचा गल्ला जमवला आहे. गेल्या 14 एप्रिलला हा सिनेमा जगभर रिलीज झाला होता. भारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 134 कोटींची कमाई केली होती. 

लवकरच येणार ‘केजीएफ 3’‘केजीएफ’च्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. लवकरच या चित्रपटाचा तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘केजीएफ 3’ येणार असल्याचं कन्फर्म केलं आहे. तिसरा पार्ट 2024 मध्ये रिलीज होईल. येत्या ऑक्टोबरपासून या चित्रपटाचं शूटींग सुरू होईल.

टॅग्स :केजीएफयशअ‍ॅमेझॉन