बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. कालचं सिद्धार्थने आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची झक्कास पार्टीही रंगली. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी झालेत. या पार्टीची नशा उतरली नाही की, ‘बर्थ डे बॉय’ सिद्धार्थचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. होय, अगदी काही तासांपूर्वी सिद्धार्थ प्रसिद्ध फॅशन डिझाईनर रोहित बल याच्या फॅशन शोसाठी पाहोचला. याठिकाणी रोहितने डिझाईन केलेली शेरवानी घालून सिद्धार्थ रॅम्प वॉक करणार होता. त्यानुसार, सिद्धार्थ रॅम्प वॉकसाठी स्टेजवर आला आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. पण हे काय? सिद्धार्थच्या ऐन एन्ट्रीवेळी एक कुत्राही स्टेजवर भटकत पोहोचला. मग काय, या भटक्या कुत्र्याला पाहून सगळीकडेच खसखस पिकली. खुद्द सिद्धार्थलाही हसू आवरता आले नाही. यानंतर कसेबसे या कुत्र्याला स्टेजवरून हाकलून लावण्यात आले.
Watch Funny Video : रॅम्प वॉक करत होता सिद्धार्थ मल्होत्रा; अचानक स्टेजवर पोहोचला कुत्रा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:26 IST
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. कालचं सिद्धार्थने आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची झक्कास पार्टीही रंगली. या पार्टीची नशा उतरली नाही की, ‘बर्थ डे बॉय’ सिद्धार्थचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
Watch Funny Video : रॅम्प वॉक करत होता सिद्धार्थ मल्होत्रा; अचानक स्टेजवर पोहोचला कुत्रा!!
ठळक मुद्दे सिद्धार्थ लवकरच ‘जबरिया जोडी’ या चित्रपटात दिसणार आहे.यात सिद्धार्थच्या अपोझिट परिणीती चोप्रा दिसणार आहे. याशिवाय विक्रम बत्राच्या बायोपिकमध्येही त्याची वर्णी लागली आहे.