Join us

​अनर्थ टाळला! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याशेजारी भीषण आग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:20 IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ आज सकाळी अचानक तीन गाड्यांनी पेट घेतला. या तिन्ही गाड्या अमिताभ यांच्या बंगल्याशेजारी एका शाळेसमोर कडेला होत्या. सकाळी सकाळी विद्यार्थ्यांची शाळेच्या गेटवर वर्दळ असताना अचानक या गाड्यांनी पेट घेतलेला पाहून सगळीकडे खळबळ उडाली.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ आज सकाळी अचानक तीन गाड्यांनी पेट घेतला. या तिन्ही गाड्या अमिताभ यांच्या बंगल्याशेजारी एका शाळेसमोर  कडेला  होत्या. सकाळी सकाळी विद्यार्थ्यांची शाळेच्या गेटवर वर्दळ असताना अचानक या गाड्यांनी पेट घेतलेला पाहून सगळीकडे खळबळ उडाली. एका टिष्ट्वटर युजरने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो लगेच सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे ही घटना वाºयासारखी पसरली. सुदैवाने यात कुठलीही प्राणहानी झाली नाही.}}}}सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली.अमिताभ यांच्या घराच्या बाजुला मटुश्री कुंदनगौरी मनहरलाल संघवी हायस्कूल आहे. याच कारच्या गेटजवळ या गाड्या पार्क केलेल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की, यामुळे अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याचीही हानी होऊ शकली असती. मात्र अग्निशमन दलाने ती वेळीच आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या तीन गाड्यांना अचानक लागलेल्या या आगीमागचे कारण अद्याप अज्ञात आहे.रामगोपाल वर्मा सध्या ‘सरकार3’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. लवकरच याचे ट्रेलरही आपल्याला पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आणि ‘ड्रॅगन’च्या शूटींगमध्येही अमिताभ बिझी आहेत.  अलीकडे  अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसचे निमंत्रण मिळाले होते. बकिंगहम पॅलेसमध्ये होणाºया भारत ब्रिटीश सांस्कृतिक कार्यक्रमात बिग बींनी सहभागी व्हावे, असे ९० वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय यांची इच्छा होती. पण अमिताभ यांनी हे निमंत्रण नाकारले. काही पूर्व नियोजित कमिटमेंटमुळे अमिताभ या भव्य सोहळ्याला जाऊ शकणार नाहीयेत. त्यामुळे अमिताभ यांनी याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. अर्थात सोशल मिडीयावर अमिताभ यांनी याबद्दल कोणतीच माहिती अद्याप दिलेली नाही.