Join us

​क्रिती सॅननमुळेच झाले होते का सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडेचे ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:41 IST

सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे ब्रेकअप झाल्यापासून या ब्रेकअपला कोण कारणीभूत आहे याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ...

सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे ब्रेकअप झाल्यापासून या ब्रेकअपला कोण कारणीभूत आहे याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. सुशांत आणि अंकिताचे पवित्र रिश्ता या मालिकेपासून अफेअर होते. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या या सहा वर्षांच्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले.अंकितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर क्रिती सॅननसोबत सुशांतचे सूत जुळल्याची चर्चा सुरू आहे. तो आजकाल अनेक ठिकाणी क्रितीसोबत पाहायला मिळतो. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातदेखील या दोघांच्या नात्याबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. सुशांतने या पुरस्कार सोहळ्यात तैंनू काला चष्मा... या गाण्यावर नृत्य सादर केले होते. त्याचा हा परफॉर्मन्स खूपच चांगला झाला. पण या परफॉर्मन्सच्या शेवटी घडलेल्या एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या परफॉर्मन्सच्या शेवटी क्रितीकडे पाहून सुशांतने काहीतरी इशारा केला आणि त्यावर क्रिती हसली. त्यामुळे हे सगळे काही पाहिल्यावर दाल में कुछ काला है असेच उपस्थितांना वाटले होते.एवढेच नव्हे तर खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतेय की, या पुरस्कार सोहळ्याच्यावेळी क्रिती सतत सुशांतसोबतच होती. तसेच या पुरस्कार सोहळ्याच्यावेळी ती कित्येक वेळ सुशांतच्याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसली होती. क्रिती आणि सुशांत त्यांच्या नात्याबद्दल कबुली देत नसले तरी हे सगळे एेकून कुछ तो गडबड है असेच म्हणावे लागेल. क्रिती आणि सुशांत हे एकमेकांच्या प्रेमात आहेत की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.