Join us

war begins with advance booking : ‘काबिल’चा पहिला शो ‘रईस’ सोबतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 20:52 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा ‘रईस’ व बॉलिवूडचा ‘सुपरहीरो’ हृतिक रोशन याचा ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित ...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा ‘रईस’ व बॉलिवूडचा ‘सुपरहीरो’ हृतिक रोशन याचा ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करण्याहून सुरू झालेली लढाई थांबण्याचे नावच घेत नाही असे दिसतेय. काबिल हा चित्रपट २५ जानेवारीला सायंकाळी रिलीज होणार होता. शुक्रवारी या दोन्ही चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान हृतिक रोशनने शाहरुखने माझ्या वडिलांचे मन दुखविले आहे असा आरोप शाहरुखवर केला आहे. शाहरुख खानने गुरुवारी तुम्ही रईसचे अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग करू शकता अशी घोषणा केली होती. शुक्रवारी सुरू झालेल्या अ‍ॅडव्हॉन्स बुकिंगमध्ये रईस व काबिल या दोन्ही चित्रपटाची तिकीटे बुक करता येत आहेत. शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘रईस’ या चित्रपटात एका अवैध धंदे करणाºया व्यवसायिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहुल ढोलकिया करीत असून या चित्रपटाचे डॉयलॉग प्रोमो व गाणी हिट ठरली आहेत. दुसरीकडे शाहरुखला टक्क र देण्यास हृतिक रोशन व राकेश रोशन ही जोडी सज्ज झाली आहे. Read More : शाहरुख खानच्या ‘रईस’चा असादेखील ‘मॅशअप’ विक्रमकाबिलच्या प्रमोशनावर आतापर्यंत फारसा भर देण्यात आला नव्हता. आता मात्र काबिलही कुठेच मागे पडू नये यासाठी जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे. काबिलमधील हृतिक रोशनच्या दमदार डॉयलॉग्सचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान आपल्या चित्रपटाविषयी बोलताना हृतिक रोशनने आपला संयम बाजूला ठेऊन शाहरुख खानवर निशाना साधला. हृतिक म्हणाला, जर व्यवस्थित प्लॉनिंग करता आली असती तर रईस सोबतचा क्लॅश टाळता आला असता. दोन्ही चित्रपट आमोरा-समोर असल्याने मी दुखी आहे. माझे वडील माझ्याहून अधिक दुखी आहे. ते नहमीच गोष्टींच्या प्लॉनिंगवर भर देत चूक होऊ नये याचा प्रयत्न करतात आणि हिच अपेक्षा ते इतरांकडून ठेवतात. जेव्हा असे होत नाही तेव्हा त्यांना दु:ख होते. Read More : ​तर ‘काबिल’ व ‘रईस’ यांनी केली असती ३०० कोटींची कमाईमागील वर्षाच्या उत्तरार्धापासून आमिर खानचा ‘दंगल’, शाहरुख खानचा ‘रईस’ व हृतिक रोशनचा ‘काबिल’ या चित्रपटाच्या क्लॅश बद्दल चर्चा होत होती. यात दंगलने बाजी मारीत सर्वांत आधी प्रदर्शित झाला. दरम्यान काबिल २६ जानेवारीला प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आले. मात्र शाहरुख खानने रईसचे प्रदर्शन २६जानेवारीला करणार असल्याचे सांगितल्याने राकेश रोशन यांनी काबिलच्या प्रदर्शनाची तारीख एक दिवस पुढे ढकलली. २५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता काबिल प्रदर्शित केला जाईल असे जाहिर केले. याच्या एक दिवसानंतर शाहरुख खानने रईस २५ जानेवारीला प्रदर्शित केला जाईल अशी घोषणा केली. यावर राकेश रोशन यांनी आपला राग व्यक्त केला होता आता लोक माझ्या व्यवसायाला समजू लागले आहेत असे ते म्हणाले होते. Read More : ‘काबिल-रईस’ बॉक्स आॅफिस क्लॅशमुळे राकेश रोशनचा पारा चढला!शाहरुख खानेन यावर आपली प्रतिक्रिया देताना माझ्या चित्रपटाशी अन्य चित्रपटाचा क्लॅश टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण दरवर्षी २०० चित्रपट प्रदर्शन करण्यासाठी केवळ ५२ आठवड्याचा वेळ मिळतो अशा वेळी क्लॅश होणारच असे मत व्यक्त केले होते. माझा चित्रपट आधीच खूप उशीरा येत आहे असेही तो म्हणाला. ALSO READ​सलमानने शेअर केल्या जुण्या आठवणी; शाहरुख, हृतिकला दिल्या शुभेच्छा​गाणे पुन्हा नव्याने...