Join us  

बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:16 PM

तसे पाहिले तर यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्न करुन संसार थाटला. त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र त्याच बरोबरच असेही काही सेलेब्स आहेत जे आगामी काळात लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले असून त्यांचीही चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे.

- रवींद्र मोरे  

अलिकडे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे दोघेही लग्नाच्या बंधनात अडकून आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले. तसे पाहिले तर यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्न करुन संसार थाटला. त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र त्याच बरोबरच असेही काही सेलेब्स आहेत जे आगामी काळात लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले असून त्यांचीही चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. जाणून घेऊया त्या सेलेब्सबाबत...

* प्रियांका चोप्रा-निक जोनास देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या कपल्सचीही चर्चा जोरदार सुरू आहे. तिच्या लग्नाचे विधी सुरु झाले असून ते २ डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहेत. तिकडे न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाने नुकतेच प्री-वेडिंग सेलिब्रेशन  केले असून तिने ब्रायडल शॉवर आणि बॅचलर पार्टी देखील दिली.  

* रणबीर कपूर-आलिया भट्ट रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या अयान मुखर्जीचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ची शूटिंग करत आहेत. या चित्रपटासोबतच दोघांच्या जवळीकतेच्याही बातम्या चर्चिल्या जात आहेत. सुरूवातीला याला को-अ‍ॅक्टर्सची बॉँडिंग समजली जात होती, मात्र जसजशी चित्रपटाची शूटिंग पुढे सरकत होती, बॉँडिंग देखील मजबूत होत होती. असा अंदाज लावला जात आहे की, दोघेही एकमेकांसाठी सीरियस आहेत. या दोघांच्या रिलेशनबाबत जेव्हा शिक्कामोर्तब झाला जेव्हा दोघांच्या आई हॅँगआउट करताना दिसल्या. आता रणबीर आणि आलिया यांच्यातील जवळीकता पाहून चाहत्यांना त्यांच्याबाबत गुड न्यूजची प्रतीक्षा आहे.  

* वरुण-नताशा वरुण धवन आज यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. तसे पाहिले तर यंग अ‍ॅक्टर्ससोबत काम करण्यासाठी अनेक तारका इच्छुक असतात. मात्र वरुणच्या बाबतीत तसे घडले नाही. आलियासोबत चित्रपट केल्याने दोघांची मैत्रीच्या बातम्या तर आल्या मात्र लिंक अप नाही करण्यात आले. याच कारणाने वरुणने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालला कधी लपविण्याचा प्रयत्न केला नाही. या कपल्सच्याही लग्नाची प्रतीक्षा चाहत्यांना आहे.   

 * अर्जुन कपूर-मलायका अरोरायाच दरम्यान या दोघांच्याही लग्नाच्या अफवेची चर्चा जोर धरत आहे. तसे तर दोघांच्या मैत्रीबाबत बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षापासून गॉसिप केल्या जात आहेत. मात्र अरबाज खानसोबत घटस्पोटानंतर अर्जुनसोबत मलायकाची जवळीकता एक वेगळाच संदेश देते. काही मीडिया रिपोर्ट्सनेही हा देखील दावा केला आहे की, दोघेही एकमेकांबद्दल खूपच सीरियस आहेत.  

*अरबाज खान-जॉर्जिया एंड्रियानीमलायकासोबत घटस्पोटानंतर अरबाज खानच्या आयुष्यात एका नव्या सुंदर चेहऱ्याचे आगमन झाले आहे. तो चेहरा म्हणजे जॉर्जिया एंड्रियानी. जॉर्जिया एक मॉडल असून अरबाजपेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. ती आता २९ वर्षाचीच आहे. अरबाजसोबत बॉलिवूड पार्ट्यांमध्ये सध्या ती दिसू लागली आहे. जवळपास प्रत्येक इव्हेंट ती त्याच्यासोबत अटेंट करताना दिसत आहे. यावरुन अशी चर्चा आहे की हे दोघेही लवकरच लग्न करु शकतात. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराअरबाज खान