Join us  

Sadak 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली; पाहा, आलिया-आदित्यची रोमँटिक केमिस्ट्री अन् संजय दत्तचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:15 AM

'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत.

गेल्या काही दिवसांपाूनच चर्चेत असलेला सडक 2 सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे, खरंतर सिनेमाचा ट्रेलर हा  11 आगस्टलचा प्रदर्शित करण्यात येणार होता.अचानक संजय दत्तची तब्येत बिघडल्यामुळे हा ट्रेलर एक दिवसानंतर प्रदर्शित करण्यात आला आहे.  ट्रेलर पाहून सिनेमात रोमँटीक कथा आहे. आर्याची भूमिका साकारणारी आलिया भट्ट आदित्य रॉय कपूरच्या याची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. पण या प्रेमकथेत एक खलनायकही आहे. तिथेच संजय दत्त रवी नावाच्या ट्रॅव्हल एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला खलनायक आलिया आणि आदित्यला का वेगळा करण्याचे शडयंत्र रचत असल्याचे स्पष्ट होते. या सिनेमात  जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियांका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद यांच्याही भूमिका आहेत.

 बॉलिवूडच्या सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या सिनेमांमध्ये 'सडक २' चा नंबर लागतो. पण कोरोनामुळे इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमालाही फटका बसला. त्यामुळे हा सिनेमा आताा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. सडक २ हा सिनेमा डिज्ने आणि हॉटस्टारवर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा या महिन्याच्या शेवटी २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.सडक २' हा महेश भट्ट यांच्या 'सडक' सिनेमाचा सिक्वेल आहे. पूजा भट्टदेखील या सिनेमात झळकणार आहे.

'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. तर दुसरी बाब म्हणजे आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या दोन बहिणी पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमात दिसणार आहे. 'सडक' या सिनेमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. यातील गाणीही सुपरहिट झाली होती. आता इतकी मोठी स्टार कास्ट असल्यावर हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :सडक 2संजय दत्तमहेश भट